शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील आरोग्य तपासणीसाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:00 IST

विद्यार्थ्यांना नेमणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी महापालिकेला विनंती : महाविद्यालयाने हात वर केल्याबद्दल पालकांना खंत

ठळक मुद्देनर्सिंग महाविद्यालयात शिकणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी महापालिकेतर्फे नेमण्यात आलेया कामासाठी विद्यार्थ्यांना नेमू नये, अशी विनंती पालकांतर्फे करण्यात आली आहे शहरातील नर्सिंग महाविद्यालयांनी हात वर केल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे

सोलापूर : नर्सिंग महाविद्यालयात शिकणाºया विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी महापालिकेतर्फे नेमण्यात आले आहे. या कामासाठी विद्यार्थ्यांना नेमू नये, अशी विनंती पालकांतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधी शहरातील नर्सिंग महाविद्यालयांनी हात वर केल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.शहरातील खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाºया ३०० विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी व अप्रेंटिसशिपसाठी बोलावण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गरज पडल्यास नागरिकांच्या छातीचा एक्स-रे काढून कोविड व न्यूमोनिया आजार तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील नर्सिंग प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांकडून काम सुरू करण्यात आले असून, शहरातील विविध आरोग्य केंद्रात ते काम करत आहेत.

या विरोधात काही पालकांनी महापालिकेकडे धाव घेतली. आमची मुले लहान आहेत, त्यांना जोखमीचे काम देऊ नका. त्यांचा शिक्षणाचा कालावधी देखील पूर्ण झालेला नाही, हे योग्य नसल्याची विनंती पालकांनी केली.

काम करणाºया मुलांना फक्त सॅनिटायझर देण्यात आले आहे. मास्क देखील पुरविले जात नाहीत. तरीदेखील हे नवखे विद्यार्थी काम करत आहेत. बहुतांश विद्यार्थी हे भीतीपोटी काम करत आहेत. आपण काम केले नाही तर महाविद्यालयातून आपल्याला निलंबित केले जाईल, अशी त्यांना भीती असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे शुल्क भरण्यास उशीर झाल्यास त्यांच्यातर्फे फोन करून विचारणा केली जाते, आता विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले नसले तरी त्यांना कामाला जुंपले जात आहे. पालकांची साधी बैठक देखील महाविद्यालयांनी घेतली नाही. या विषयी विचारले असता महाविद्यालये महापालिकेला विचारा, असे सांगत आहेत.                            -पालक

विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व साधने उपलब्ध करून देऊ. जे विद्यार्थी परगावी राहतात त्यांच्या राहण्याची सुविधा करून दिली जात आहे. जे शहरात राहतात त्यांना त्यांच्या घराजवळ काम देण्यात येणार आहे. कोरोना योद्धे म्हणून त्यांना विम्याचे संरक्षणही मिळेल. - पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयEducationशिक्षण