१़८० कोटींच्या औषध खरेदीस मान्यता

By Admin | Updated: August 6, 2014 01:11 IST2014-08-06T01:11:26+5:302014-08-06T01:11:26+5:30

जि़प़स्थायी समिती सभा: मालमत्ताप्रश्नी आता सीईओ लक्ष घालणार

The recognition of drug purchase of Rs.180 crore | १़८० कोटींच्या औषध खरेदीस मान्यता

१़८० कोटींच्या औषध खरेदीस मान्यता


सोलापूर: जि. प.च्या आरोग्य विभागासाठी १ कोटी ८० लाखांच्या औषध खरेदीस स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ जि़प़च्या मालमत्तांप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी लक्ष घालणार असल्याचा शब्द दिला आहे, असे जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांनी सांगितले.
जि़प़च्या स्थायी समितीची बैठक सोमवारी डॉ़ निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समिती, जि़प़ सेसमधून श्वानदंश लस खरेदी, औषधे व साहित्य अशा सुमारे १ कोटी ८० लाखांच्या खरेदीस यावेळी मान्यता देण्यात आली़ माढा तालुक्यातील उपळाई बु़ येथे आरोग्य कर्मचारी निवास बांधकामासाठी ४८ लाख १२ हजारास मंजुरी देण्यात आली़ जिल्हा ग्रामनिधीतून मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी ग्रामपंचायतीला व्यापारी गाळे बांधण्यासाठी ६़३६ लाख तर सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी ग्रामपंचायतीला २२ लाख ३० लाखांचा निधी व्यापारी गाळे बांधण्यासाठी देण्यात आला़
यावेळी मालमत्तांचा तसेच इतर कामांचा आढावा घेण्यात आला़ दुपारी दोन वाजता सभा सुरू झाली, सायंकाळी पाच वाजता ही सभा संपली़ सभा सुरू होण्यापूर्वी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी जोपर्यंत शोध लागत नाहीत तोपर्यंत सभा तहकूब ठेवाव्यात अशी मागणी जि़प़ सदस्या सीमा पाटील यांनी केली़ याप्रकरणी निषेधाचा ठराव मांडण्यात आला. सुरेश हसापुरे व मकरंद निंबाळकर यांनी हा ठराव मांडला़
------------------------------
अन् ‘स्थायी’ सभा झाली...
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जि़प़ आवारातील पुतळ्याची विटंबना झाली, त्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत निषेध मोर्चा काढला़ या प्रकरणाचा शोध लागत नाही तोपर्यंत जि़प़ची कोणतीही सभा, बैठक होऊ देणार नसल्याच्या वल्गना जि़प़च्या काही सदस्यांनी केल्या होत्या़ असे जाहीर केले असताना सोमवारी जि़प़च्या स्थायी समितीची सभा झाली़ जि़प़ सदस्या सीमा पाटील यांनी पत्र देऊन सभा तहकूब करण्याची विनंती केली मात्र सभेत निषेधाचा ठराव करून सभा घेण्यात आली़

Web Title: The recognition of drug purchase of Rs.180 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.