शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे येणार सोलापूरवर जलसंकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:50 IST

उजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यास शहरावर पाणीटंचाई ओढवणार

ठळक मुद्देउजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी टाकळी येथे संयुक्त पाहणी करतीलउजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यास शहरावर पाणीटंचाई ओढवणार

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा सोमवारी कोरडा पडला. टाकळी इनटेक वेलमधील पाणी २२ मेपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत उजनी धरणातून पाणी न सोडल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. औज बंधाºयातील पाणी टाकळी इनटेक वेलमध्ये घेतले जाते. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेक वेलमध्ये सोमवारी ९ फूट ६ इंच पाणी होते. हे पाणी २२ मेपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. विभागीय दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच टंचाई आढावा बैठक घेतली.

या बैठकीत उजनीतून सोलापूरसाठी १५ मे रोजी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. उजनीतून सोडलेले पाणी औजमध्ये पोहोचण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. उजनी धरणातील पाणीपातळी खालावली आहे. उजनी पंपगृहासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. उजनी पंपगृहातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उजनीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यास शहरावर पाणीटंचाई ओढवणार आहे.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी टाकळी येथे संयुक्त पाहणी करतील. त्यानंतर पाणी सोडण्याबाबत निर्णय होईल.- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळUjine Damउजनी धरण