शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

रिअल ‘सिंघम’; धावत्या गॅस टँकरवर चढून भरकटलेली गाडी ‘ट्रॅफिक कंट्रोल’

By appasaheb.patil | Updated: September 12, 2020 13:39 IST

सोलापूर लोकमत विशेष...

ठळक मुद्दे- सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्याजवळील घटना- पोलिस नाईक संजय चौगुले यांनी मोठया शिताफीने थांबविला गॅस टँकर- पोलिस नाईक संजय चौगुलेंच्या कार्याची वरिष्ठांनी घेतली दखल

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्याजवळ बेशुध्दावस्थेतील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले होते़ प्रसंगावधान राखून महामार्ग पोलिस मदत केंद्रातील पोलीस नाईक संजय चौगुले यांनी सतर्कतेने मोठया शिताफीने चालू गॅस टँकरवर चढून, दरवाजा उघडून ब्रेक मारून धावता टँकर थांबविला़ त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर-पुणे महामार्गावरील पाकणी येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले (बक्कल नंबर २२५) हे सेवा बजावित होते़ यावेळी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक वेडावाकडा येत असल्याचे चौगुले यांच्या निर्दशनास आला़ त्यानंतर चौगुले यांनी त्या ट्रकचालकाला हात दाखवित थांबविण्याचा इशारा केला, परंतू ट्रकचालक हा सीटवर पडलेला दिसला़ त्यानंतर पोलिस नाईक चौगुले यांनी मोठया शिताफीने गॅस टँकरवर चढून चालकाच्या साईडचा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला.

 पोलिस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली. दरम्यान, चौगुले यांच्या कार्याचे शुक्रवारी व शनिवारी दिवसभर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गAccidentअपघात