भेटी लागी जीवा, लागलीसे आस! ॲम्ब्युलन्समधून पंढरपूर गाठलं; स्ट्रेचरवरून विठ्ठल दर्शन घेतलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 10:39 IST2021-02-16T04:24:03+5:302021-02-16T10:39:52+5:30
सोलापूरमधील डॉ. ज्ञानेश राजाराम होमकर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र अखेरच्या वर्षी कॉलेजमध्ये ...

भेटी लागी जीवा, लागलीसे आस! ॲम्ब्युलन्समधून पंढरपूर गाठलं; स्ट्रेचरवरून विठ्ठल दर्शन घेतलं
सोलापूरमधील डॉ. ज्ञानेश राजाराम होमकर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बाळगले होते. मात्र अखेरच्या वर्षी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नृत्य करताना पाय घसरून पडले. यावेळी ते गंभीर जखमी
झाले. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केले, पण मानेपासून खालचे अवयव हात, पाय निकामी अवस्थेत आहेत. केवळ डोळे, कान, डोके सुखरूप आहेत. ते २०१३ पासून हे अंथरुणावर पडून आहेत. दरम्यान, घरातील धार्मिक वातावरणामुळे डॉ. ज्ञानेश यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार वडील राजाराम होमकर यांनी डॉ. ज्ञानेश यांना रुग्णवाहिकेतूनला नेले. पंढरीत आल्यानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दर्शनाची विनंती केली. मंदिरात दुपारच्या वेळी भाविकांची गर्दी कमी असते. या वेळेचा लाभ घेता येईल, असे सांगून त्याच वेळी डॉ. ज्ञानेश यांना स्ट्रेचरवरून मंदिरात आणत विठ्ठलाचे दर्शन घडवले.
कोट :::::
विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी एका सामान्य भाविकाला विनंतीवरून विठ्ठल दर्शन घडवून आणले. त्यामुळे आम्ही होमकर कुटुंबीय कृतार्थ झालो.
- राजाराम होमकर,
वडील
फोटो
१५ पंढरपूर-होमकर
ओळी
स्ट्रेचरवर असलेल्या डॉ. ज्ञानेश होमकर यांच्याशी चर्चा करताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी.