शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांकडे १०० कोटी रुपयांची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 10:57 IST

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था,कंपन्या, शेती, वाहनांसाठी ८९ कोटींचे त्यांनी कर्ज काढले.

ठळक मुद्देमाढा लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबीयांच्या नावे १०० कोटींची स्थावर मालमत्तारणजितसिंह व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ११७ तोळ्याचे सोन्याचे दागिने रणजितसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध दोन गुन्हे दाखल असल्याचा त्यांनी उल्लेख केला असून, एका खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू

सोलापूर : माढा लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी दाखल केलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबीयांच्या नावे १०० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था,कंपन्या, शेती, वाहनांसाठी ८९ कोटींचे त्यांनी कर्ज काढले असून, आयकर विभागाची ५६ लाख ७८ हजारांची थकबाकी आहे. 

रणजितसिंह नाईक-निंबाळकर (वय ४२) हे सातारा जिल्ह्यातील निंभोरे येथील रहिवासी आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण दिलेले आहे. स्वत:बरोबरच पत्नी जिजामाला, मुले ताराराजे व इंद्रराजे यांच्या नावे असलेल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.

सन २०१४ मध्ये त्यांचे उत्पन्न ६१ लाख ५३ हजार इतके होते तर आता २०१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ३ कोटी ६४ लाखांवर गेले आहे. रणजितसिंह यांच्या नावे इर्टिगा, टाटा सुमो:३, इनोव्हा, फॉर्च्युनर, बोलेरो, सुमो ग्रॅन्डे तर पत्नीच्या नावे मर्सिडीज, सुमो अशी वाहने आहेत. रणजितसिंह यांच्या नावे, शेतजमीन, निवास व कमर्शियल इमारती, कारखाने अशी ८४ कोटी ६ लाखांची संपत्ती आहे.

पत्नीच्या नावे १0 कोटी १२ लाख तर मुलगा ताराराजे याच्या नावे ३ कोटी २६ लाख तर इंद्रराजे याच्या नावे ३ कोटी २४ लाखांची संपत्ती आहे. विविध कंपन्या व शेती विकासासाठी घेतलेल्या कर्जामध्ये रणजितसिंह यांच्या नावावर ६९ कोटी २६ लाख तर पत्नीच्या नावावर १९ कोटी ८0 लाख असे ८९ कोटी ६  लाख इतके कर्ज आहे. याचबरोबर विविध बँकांमध्ये डिपॉझिट, कारखान्यांचे शेअर्स, विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

भुगाव-मुळशी, दलवडी, गाडेवाडी, निकंबवाडी, जाधववाडी, उपळवे, ठाकुरकी येथे शेतजमीन आहे. तसेच खर्डेवाडी, निकंबवाडी, उपळवे, झिरापवाडी येथे नॉनअ‍ॅग्री जमीन विकसित केली आहे. फलटण येथे मेटकरी कॉम्प्लेक्स, सिद्धिविनायक अपार्टमेंट जाधववाडी, फलटण येथे अपार्टमेंट, पुण्यात धनकवाडी येथे घर, फलटणमधील लक्ष्मीनगरात बंगला आहे. 

यामध्ये रणजितसिंह यांच्या नावावरील जमीन व बांधकामाची किंमत ५ कोटी ३८ लाख, पत्नीच्या नावे: ७ कोटी २६ लाख इतकी होत आहे. 

११७ तोळे सोनेरणजितसिंह व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ११७ तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत. यात रणजितसिंह यांच्याकडे ७१ तोळ्याचे (किंमत: २३ लाख ३२ हजार) तर पत्नीकडे ४६  तोळ्याचे ( १५ लाख ११ हजार) दागिने आहेत. दागिने कोणकोणते आहेत, चांदीच्या दागिन्याबाबत  मात्र त्यांनी तपशील दिलेला नाही. त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल असल्याचा त्यांनी उल्लेख केला असून, एका खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर