शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सत्तर दिवस शाळा चालवली; एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 3:25 PM

अनगरनं करून दाखविलं; पालकांची पूर्वसंमती 

अनगर : शाळा म्हणजे मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबा खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोड्या... मौज, दंगामस्ती... सगळीकडे आनंदी आनंद; पण गेल्या दीड वर्षापासून मुलांचा हा आनंद कोरोनाच्या महामारीने हिरावून घेतला आहे; पण याला अपवाद आहे निसर्गाच्या कुशीत असलेली अनगरची ही शाळा! ही शाळा मागील ७० दिवसांपासून अविरत सुरू आहे. योग्य ती काळजी घेतल्यामुळे इतक्या दिवसांत एकाही विद्यार्थ्याला संसर्ग झाला नाही. इतर शाळांना ही शाळा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अनगर या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर ही एक विविध उपक्रमांनी सुरू असलेली शाळा आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २२०० विद्यार्थीसंख्या असलेली सर्वांत मोठी शाळा म्हणून हिला ओळखले जाते. या शाळेचे अनुकरण करत परिसरातील अनेक शाळा सुरू होत आहेत. शाळा चालू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत पाटील  व सचिव अजिंक्यराणा पाटील यांची प्रेरणा, तर गावकरी व पालकांचे मोलाचे सहकार्य आहे.

जुलै महिन्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या शिफारसीने शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे परिपत्रक काढले व त्यानुसार संस्थाप्रमुख माजी आमदार राजन पाटील, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी २२ जुलैपासून स्वजबाबदारीवर शाळा सुरू केली. आज या शाळेला ७० दिवस पूर्ण झालेले आहेत. सुरुवातीला पाचवी व सातवीचे वर्ग कट्ट्यावर, झाडाखाली, मोकळ्या मैदानात व व्हरांड्यात भरवण्यात आले. आज मात्र ही शाळा बिनधास्त भरतेय.

अनगर शाळेने अशी घेतली काळजी 

  • सर्व शिक्षकांची दोन वेळा आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करण्यात आली.
  • सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली.
  • शाळेच्या गेटवर थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश व सॅनिटायझेशन करण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमतीपत्रे घेण्यात आली.
  •  सर्व वर्ग भरायच्या व सुटायच्या वेळा वेगवेगळ्या ठेवल्या.
  •  शाळा सुटल्यानंतर वर्ग फवारून सॅनिटायझेशन केले.
  •  
  • गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीत शाळा बंद असल्यामुळे  विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले होते. यापुढे हे शैक्षणिक नुकसान आपणास परवडणारे नाही, म्हणून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली.  

-राजन पाटील, माजी आमदार

संस्थेचे प्रमुख राजन पाटील व पालकांच्या सहमतीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू केली व सर्वांच्या सहकार्यामुळेच ती सुरू झाली. आतापर्यंत एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडलेला नाही.-चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणmohol-acमोहोळ