Rambharose is in charge of the health department of Solapur Zilla Parishad | कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे

कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्हाधिकाºयांशिवाय कोणीच हा विषय गांभीर्याने घेताना दिसत नाहीआरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोलापूरकडे फिरकले नाहीतजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ गेले दोन दिवस रजेवर होते

सोलापूर : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात शुकशुकाट जाणवत आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी आरोग्य विभागाचा कारभार कोणाकडे आहे याची विचारणा केल्यावरही प्रशासनाने माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ गेले दोन दिवस रजेवर होते. मंगळवारी पुण्यातील बैठकीला ते हजर राहण्यास गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेत मोजक्याच अधिकाºयांची हजेरी दिसत होती.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांची दालने उघडी होती, पण अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हेही रजेवर गेले आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाºयांनी आॅक्सिजनबाबत घेतलेल्या आढावा बैठकीला हजर राहण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नव्हते. नाईलाजाने ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांना ऐनवेळी बैठकीला पाठविण्यात आले. 

जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नासंबंधी चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याबाबत जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी आरोग्याच्या खरेदीबाबत तक्रार करायची असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे कार्यालय गाठले. पण वायचळ हे पुण्याला गेल्याचे सांगितल्यावर आरोग्याचा पदभार कोणाकडे आहे, अशी विचारणा केली, पण त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचे काय होणार, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्हाधिकाºयांशिवाय कोणीच हा विषय गांभीर्याने घेताना दिसत नाही. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोलापूरकडे फिरकले नाहीत. ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात बेड उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य यंत्रणेने काय यंत्रणा लावली, याबाबत जाब विचारणार असल्याचे सभापती डोंगरे यांनी सांगितले. 

Web Title: Rambharose is in charge of the health department of Solapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.