लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर / चंद्रपूर : किडनी रॅकेटचे कनेक्शन सोलापूरपर्यंत पोहोचल्यानंतर येथील पोलिस यंत्रणा ही सज्ज झाली आहे. आरोपी रामकृष्ण याने गोड बोलून येथे कोणाला फसवले आहे का? याचा शोध पोलिस आपल्या स्तरावर घेत आहेत. त्यातच या घटनेनंतर त्याने विविध ठिकाणी आपली माया कमावली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात सोलापुरात त्याने २० एकर जमीन घेतल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
रामकृष्ण हा शांत संयमी होता. तो जास्त कोणाशी बोलत नव्हता. पण, त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे कोणाला कळू नये याची तो खबरदारी घ्यायाचा. तो जरी अलिशान कारमधून फिरत असला तरी कार तो स्वतः चालवत होता. त्याने चालकही ठेवलेला नव्हता. जर एखाद्याकडे त्याचे काम असेल तर तो त्याला आपल्या पतसंस्थेत बोलावत होता. आपल्या शब्दाने त्याला मोहित करून तेथून अवघ्या काही मिनिटात पाठवत होता. त्याला जास्त वेळ आपल्या जवळ बसू देत नव्हता.
अशोक चौकातील मंदिरासाठी दिली रक्कम
त्याने जुनी विडी घरकुल परिसरातील वैष्णवी देवी मंदिरांचे जीर्णोद्धारासाठी ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याची माहिती नागरिक सांगतात. तिथे तशी कोनशिलाही आहे. अशोक चौकात एक धार्मिक विधी काही दिवसापूर्वी झाला. यासाठी त्याने लाखो रुपये दिल्याची माहिती मिळाली.
म्हणे... इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आयात-निर्यात व्यवसाय
तो धार्मिक कार्यक्रमावर अमाप पैसा खर्च करत होता. हे पैसे कोठून आणले असे विचारण्यास कोणी धजत नव्हते. जरी विचारले तरी तो आपले हैदराबाद येथे हॉटेल असून त्याचे उत्पन्न असल्याचे मत त्यांचे होते. जर एखाद्या जवळच्या कोणी त्याला विचारल्यास त्याला तो बाहेर देशात आपण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा आयात-निर्यात व्यवसाय करत असल्याचे सांगत होता.
डोनर कम्युनिटीमार्फत सुंचू गरजूंना हेरुन किडनी विक्रीसाठी तयार करायचा..
किडनी रॅकेटमधील चंदीगडमधून अटक केलेला हिमांशू भारद्वाज याने 'किडनी डोनर कम्युनिटी' या ग्रुपच्या माध्यमातून देशभरात एजंटांचे जाळे विणले होते. कथित डॉ. कृष्णा ऊर्फ रामकृष्ण सुंचू हा महाराष्ट्राचा एजंट होता. गरजूंना हेरून तो किडनी विक्रीसाठी बाध्य करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
सुंचू याची पोलिस कोठडी गुरुवारी संपली. तो पोलिसांना योग्य माहिती देत नसल्याने त्याच्या पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. तर, फरार सावकार मनीष घाटबांधे याला २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रोशन कुळे हा डॉक्टर कृष्णाशी फेसबुकवरील किडनी डोनर कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातूनच संपर्कात आला होता. तो क्रिष्णा, भारद्वाज व अन्य एकासह कंबोडिया येथे गेला होता. त्यापैकी दोघांना एसआयटी पथकाने अटक केली आहे. तर, फरार असलेल्या अभियंत्याला पोलिस शोधत आहेत.
विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल
कुळे, डॉक्टर क्रिष्णा व भारद्वाज हे कंबोडियाला जातानाचा व्हिडिओ गुरुवारी सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या सर्व युवकांची पोलिस माहिती गोळा करीत आहेत.
दरम्यान, कृष्णा व भारद्वाज याने किडनी विक्री केलेल्या काहींची नावे पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रिस्क्रिप्शन देणारा डॉक्टर कोण ?
कंबोडियाला जाण्यापूर्वी सर्वच जणांची कोलकाता येथील पॅथॉलॉजीमध्ये तपासणी करण्यात आली. यासाठी प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या डॉक्टरचाही पोलिसांना शोथ आहे. पॅथॉलॉजीमधून कागदपत्र मागविले आहे.
Web Summary : Ramkrishna acquired 20 acres through kidney sales, police investigate. He used a Facebook group, 'Kidney Donor Community,' to build a network for organ trafficking. He spent lavishly on religious events, claiming income from hotels and electronics imports.
Web Summary : रामकृष्ण ने किडनी बेचकर 20 एकड़ जमीन खरीदी, पुलिस जांच कर रही है। उसने फेसबुक ग्रुप 'किडनी डोनर कम्युनिटी' के माध्यम से अंग तस्करी के लिए एक नेटवर्क बनाया। धार्मिक आयोजनों पर खूब खर्च किया, होटल और इलेक्ट्रॉनिक्स आयात से आय का दावा किया।