शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महूदमधील छत्रपती घराण्याच्या जागेसंदर्भातील प्रश्नासाठी राजमाता सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:01 IST

अधिकाºयांची भेट घेऊन केली मागणी

ठळक मुद्देराजमाता कल्पनाराजे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचीही भेट घेतलीराजमाता कल्पनाराजे भोसले या झेडपीमध्ये सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दिला

सोलापूर : साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील महूद येथील छत्रपती भोसले घराण्याच्या जागेवर चाललेले पाच मजली अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी  शुक्रवारी दुपारी येथील झेडपी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे केली आहे. 

राजमाता कल्पनाराजे भोसले या शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला झेडपीमध्ये आल्या. त्यांनी सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन तक्रारी अर्ज दिला. सांगोला तालुक्यातील महूद बु. येथे मालमत्ता क्र. ७२६/१ ही भोसले घराण्याची आहे. या जागेवर उत्तम मारुती खांडेकर (रा. नवी लोटेवाडी, ता. सांगोला) यांनी सिटी सर्व्हे क्र. १३०/२ अन्वये रेखांकन मंजूर करून घेऊन पाच मजली बांधकाम सुरू केले आहे. या मिळकतीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या बांधकामाचे रेखांकन रद्द करावे व जागेवर सुरू असलेले बांधकाम तातडीने पाडून टाकावे, असे नमूद केले आहे. 

या जागेवर मंजूर केलेल्या रेखांकनास हरकत घेतली होती. तरीही मंजूर रेखांकन आराखड्याविरुद्ध अनधिकृत बांधकाम नियमांची पायमल्ली करून करण्यात आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने पाडून टाकण्यात यावे, अशी मागणी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केली आहे. खांडेकर यांच्या तीन पिढ्यांनी भोसले यांच्या जागेवर रहिवास केला आहे, पण आता कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जागेवर बांधकाम केले आहे. याबाबत राजमाता भोसले यांचे कर्मचारी विचारणा करण्यास गेल्यावर खांडेकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविला आहे. लोक खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने जागेबाबत तक्रार करीत असल्याचे राजमाता कल्पनाराजे यांनी म्हटले आहे. 

पिस्तूल परवाना रद्द करा- राजमाता कल्पनाराजे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचीही भेट घेतली. अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यास गेलेल्या कर्मचाºयांवर खांडेकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे सांगितले. भोसले घराण्याच्या बºयाच ठिकाणी जमिनी आहेत. त्याची माहिती घेतली जात असल्याचे राजमाता कल्पनाराजे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSatara areaसातारा परिसरSangliसांगलीkolhapurकोल्हापूर