शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजन पाटलांनी थेट फडणवीसांना गाठले, राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:27 IST

सोबतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनाही घेतले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : माेहोळचे माजी आमदार राजन पाटील व बळीराम साठे या दोघांनी रविवारी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. लवकरच पुन्हा बैठक घेण्याचा निरोप घेतल्यानंतर सोमवारी राजन पाटील यांनी थेट दिल्लीच गाठली.

सोबतीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनाही घेतले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच रविवारी पाटील आणि बळीराम साठे या दोघांनी पवार यांची भेट घेतली. रविवारी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते; मात्र लगेच सोमवारी पाटील यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. सोबतीला आमदार बबनराव शिंदे हेही होते. 

आमच्या कारखान्याच्या व इतर काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. सहजासहजी फडणवीस यांची भेट झाली. ज्यांची सत्ता असते त्यांच्या वरिष्ठांना भेटण्यास काहीच गैर नाही. मी आहे तेथेच आहे. गैरसमज पसरवू नयेत.     - बबनराव शिंदे, आमदार  

मी व आमदार बबनराव शिंदे दोघेही दिल्लीत महाराष्ट्र सदनात होतो. तेव्हा त्या ठिकाणी फडणवीसही असल्याचे कळाले. तेव्हा कारखान्याच्या कामानिमित्त त्यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही.     - राजन पाटील, माजी आमदार

राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईकची चर्चाnमुंबई : आता राष्ट्रवादीवर भाजप सर्जिकल स्ट्राईक करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे एक बडे नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चादेखील जोरात आहे. या नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादी असे करत भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याशी जवळचे नातेसंबंध आहेत. या नेत्याची भाजप प्रवेशाबाबत एकदोन नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते. या नेत्याच्या भाजप प्रवेशाला त्याच जिल्ह्यातील एका भाजप आमदाराचा विरोध आहे.  nशिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे तीन-चार चेहरे दिसू शकतात असा एक तर्क आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस