शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे सोलापुरात येणार, पण काँग्रेसचे पदाधिकारी मंचावर नसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:55 IST

राज ठाकरे यांची १५ एप्रिल रोजी सोलापुरात सभा; भाजपाविरोधात करणार प्रचार

ठळक मुद्देनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात रान पेटविण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले - दिलीप धोत्रे,भाजपला तोटा झाला पाहिजे, हाच मनसेचा अजेंडा आहे - दिलीप धोत्रे,माढा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना या सभेला आमंत्रित करण्यात येणार - दिलीप धोत्रे,

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे १५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला समविचारी पक्षांना आमंत्रित करण्यात येईल. पण मंचावर मनसे पदाधिकारी वगळता इतर पक्षाचे नेते नसतील, अशी माहिती मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी दिली. 

धोत्रे म्हणाले, राज ठाकरे यांचा सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. जाहीर सभेसाठी मैदान निश्चित करण्यात येत आहे. ही जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांविरोधात आहे. राज्याच्या विविध भागातील मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या प्रचारात सक्रिय आहेत. पण सोलापुरात होणाºया राज ठाकरे यांच्या सभेत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे अथवा काँग्रेसचे इतर पदाधिकारी मंचावर नसतील.

या सभेला सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मोदींनी २०१४ मध्ये सोलापुरात दिलेली आश्वासने, प्रत्यक्षात झालेले काम, भाजपचे उमेदवार, त्यांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र, भाजपच्या दोन मंत्र्यांचे काम आदी माहिती मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आलेली आहे. माढा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना या सभेला आमंत्रित करण्यात येणार आहे. 

राज ठाकरे यांच्याकडे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांची कुंडली आहे. परवाच्या भेटीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात रान पेटविण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. सोलापूरची सभा काँग्रेससाठी आहे. पण या मंचावर काँग्रेस नेते नाहीत. त्यामुळे ती मनसेची सभा आहे. भाजपला तोटा झाला पाहिजे, हाच मनसेचा अजेंडा आहे. - दिलीप धोत्रे, जिल्हा संघटक, मनसे.  

टॅग्स :SolapurसोलापूरRaj Thackerayराज ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी