शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Video: तुम्ही CM किंवा PM नाहीत, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:24 IST

आता मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंनाच चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे या मनसैनिकाचा राज ठाकरेंनी एकेकाळी सत्कारही केला होता. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन राज्यात चांगलाच गदारोळ माजला आहे. मनसेविरुद्ध अनेक पक्ष असा सामना सध्या रंगल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत राज्यातील अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम केला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांचा आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर, आता मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंनाच चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे या मनसैनिकाचा राज ठाकरेंनी एकेकाळी सत्कारही केला होता. 

मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आवाहन दिलं आहे. सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः यावं त्यांचा ताफा मी अडवेन. राज ठाकरे हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी स्वतः मैदानात उतरावं, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

अजित कुलकर्णी यांनी सोलापूर मनसेच 3 वर्ष शहर उपाध्यक्षपद भूषवलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस मनसेने टोल प्रश्न हाती घेतला होता, त्यावेळी टोल फोडल्यानंतर अजित कुलकर्णींचा राज ठाकरेंनी मुंबईला बोलावून सत्कार केला होता. दरम्यान, राज ठाकरे हे कांही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस आणि आता भाजपचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत, अशी ही टीकाही कुलकर्णी यांनी केली आहे. 

मुंबई, मराठवाड्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला.

 

टॅग्स :MNSमनसेSolapurसोलापूरMumbaiमुंबईMuslimमुस्लीम