पाऊस-पाणी.. पाऊस लांबल्याने पेर वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:15 AM2021-07-10T04:15:57+5:302021-07-10T04:15:57+5:30

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीवर भर दिला. तालुक्याचे खरीप पेरणी क्षेत्र सरासरी ७ हजार ...

Rain-water .. Fear of wasting seeds due to prolonged rains | पाऊस-पाणी.. पाऊस लांबल्याने पेर वाया जाण्याची भीती

पाऊस-पाणी.. पाऊस लांबल्याने पेर वाया जाण्याची भीती

googlenewsNext

उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीवर भर दिला. तालुक्याचे खरीप पेरणी क्षेत्र सरासरी ७ हजार ७८६ हेक्टर आहे. पेरणी मात्र ६ हजार ३०५ हेक्टरवर झाली आहे. ८०.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र आता पाऊस लांबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. आता पाऊस पडण्याची आवश्यकता आहे.

पाऊस लांबल्याने केलेली पेर वाया जाईल, असे चित्र दिसत आहे. जून व जुलै महिन्यांत १७६ मि.मी. म्हणजे १२६ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्यांत १६४ मि.मी., तर जुलै महिन्यात १२.३ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. यामध्ये शेळगी व सोलापूर मंडलातील मार्डी, वडाळा व तिऱ्हे मंडळात कमी पाऊस झाला आहे.

------

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र

सोयाबीनची सर्वाधिक पेरणी ३२१७ हेक्टरवर (१०७ टक्के), उडीद ९३९ हेक्टर (१४४ टक्के), मूग २८३ हेक्टर (८१ टक्के), तूर १४४१ हेक्टर (५७ टक्के), मका ३१८ हेक्टर (४८ टक्के), भुईमूग ९८ हेक्टर (४४ टक्के) व इतर पेरणी ६,३०५ हेक्टर (८०.९८ टक्के).

----

सोयाबीन, मूग, उडीद व तूर पेरणी क्षेत्र वाढत आहे. वडाळा व परिसरात खरीप पेरणी सुरू आहे. आता पाऊस पडणे गरजेचे आहे. पाऊस लांबला तर पिके वाया जातील.

- मधुकर साठे, शेतकरी, वडाळा

-

Web Title: Rain-water .. Fear of wasting seeds due to prolonged rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.