शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

रेल्वेने केरळला ९.२६ टन वस्तूंची मदत पाठविली,  राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:11 PM

सोलापुरातून मालगाड्या रवाना : राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य

ठळक मुद्देकेरळवासीयांना रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार कर्मचाºयांकडून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत राज्यातील पाच विभागातून आजवर ८४९.२३ टनाचे साहित्य पाठविण्यात आले

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी  मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून  गेल्या पंधरा दिवसात  ९.२६ टनाची औषधे, कपडे, अन्न अशा जीवनावश्यक वस्तूंची  मदत  पाठविण्यात आली असून, राज्यातील पाच विभागातून आजवर ८४९.२३ टनाचे साहित्य पाठविण्यात आले आहे. दातृत्त्वात मात्र भुसावळ विभागाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

केरळमध्ये पुरात लाखो घरे वाहून गेली़ असंख्य लोकांचा मृत्यू झाला़ जनजीवन विस्कळीत झाले़ त्यानंतर तिकडे मदतीचा ओघ सुरु झाला़ ही मदत वेळेत पोहोचावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने  रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवली गेली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेनेदेखील अन्न, औषध, कापड आणि पाणी या साºया मदतीची वाहतूक ही मोफत करण्याचे जाहीर केले़ १८ आॅगस्टपासून ही मोफत वाहतूक सुरु झाली़ ५ सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वे विभागातून ८४९़२३ टन साहित्यांची मदत रेल्वे वाहतुकीतून पोहोचली़ पुण्यातून १४ वॅगन पाणी पोहोचवले गेले़ याबरोबरच सोलापूरमधून २१ आॅगस्ट रोजी एनटीपीसी (फताटेवाडी, दक्षिण सोलापूर)कडून काही साहित्य रवाना झाले़ जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात मुंबई शहर मात्र दुसºया क्रमांकावर ठरले़  सोलापूर शहरातून विविध संघटनाही वस्तू आणि पैशांच्या स्वरुपात मदत गोळा करुन पाठवत आहेत़

सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांचा पगार... - महाराष्ट्रातून विविध विभागातून केरळवासीयांना रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊन मानवता धर्म जोपासला आहे़ मध्य रेल्वे अर्थात मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातील सर्व रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार त्यांना दिला आहे़ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचाºयांकडून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत केरळला पोहोचली आहे़ यामध्ये सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊ केला आहे़ 

विभागनिहाय मदत़...- मुंबई     - ३१७ टन- पुणे     - १३१़३० टन - भुसावळ     - ३५१़८८ टन - नागपूर     - ३९़४४ टन- सोलापूर     - ९़२६ टन 

मध्य रेल्वेने केरळपर्यंत मालवाहतूक मोफत दिली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे़ महाराष्ट्रातील पाचही विभागातून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला़- डी़ के. शर्मामहाव्यवस्थापक, मध्य रेल्वे 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेKeralaकेरळ