रेल्वे तिकीट निरीक्षकाची बॅग लंपास; कोटसह तक्रार पुस्तिकाही पळवली

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 1, 2023 16:16 IST2023-06-01T16:16:17+5:302023-06-01T16:16:40+5:30

चारेट्यांनी तिकिट निरीक्षक यांच्या बर्थवरुन शुक्ला त्यांची सॅक बॅग लांबवली

Railway ticket inspector's bag theft; A complaint booklet along with the quote was also taken away in Solapur | रेल्वे तिकीट निरीक्षकाची बॅग लंपास; कोटसह तक्रार पुस्तिकाही पळवली

रेल्वे तिकीट निरीक्षकाची बॅग लंपास; कोटसह तक्रार पुस्तिकाही पळवली

सोलापूर  : रेल्वेत कर्तव्यावर असणा-या तिकिट निरीक्षकाची बॅग चोरट्यांनी लांबवली. ही घटना २८ मे रोजी पहाटे कुर्डूवाडी स्थानकावर घडली. याबाबत ट्रेन तिकिट निरीक्षक महेश इंद्रकरण शुक्ला (रा.सोलापूर) यांनी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसर फिर्यादी शुक्ला हे २८ मे रोजी जयंती एक्सप्रेस मधील ए सी ३ टायर मध्ये (गाडी नं १६३८१) कार्यरत होते. गाडी पहाटे २.३० ते २.४० वा दरम्यान कुर्डूवाडी स्थानकात असताना चारेट्यांनी तिकिट निरीक्षक यांच्या बर्थवरुन शुक्ला त्यांची सॅक बॅग लांबवली. त्यामध्ये तक्रार पुस्तक, कोट, नेमप्लेट व बॅचबिल्ला, मोबाइल चार्जर, डाटा मनी मशीनचा चार्जर असा एकूण ३ हजारांचा ऐवज पळला. या घटनेनंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसात धाव घेतली.

Web Title: Railway ticket inspector's bag theft; A complaint booklet along with the quote was also taken away in Solapur