शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील राहुल गांधींचा दौरा अनिश्चित; भाजप कार्यकर्ते मात्र प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 12:55 IST

सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र ...

ठळक मुद्देकाँग्रेसने राहुल गांधी यांची पार्क स्टेडियमवर सभा घेऊन गर्दी करून दाखवावी असे आव्हान सभागृहनेते संजय कोळी यांनी दिलेकाँग्रेसच्या पदाधिकाºयांना राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी कमी होण्याची भीती वाटल्याने छोट्या मैदानांचा शोध सुरू

सोलापूर : कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा १३ फेब्रुवारीचा सोलापूर दौरा अनिश्चित असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. मात्र भाजपचे कार्यकर्ते म्हणाले, त्यांच्या दौºयाची आम्ही वाट पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविलेले काळे झेंडे आम्ही विसरलेलो नाही. राहुल गांधी यांचे वेगळे स्वागत आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या १३ फेब्रुवारी रोजी सोलापुरात जाहीर सभा घेण्याचे नियोजन प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाºयांनी सभेसाठी जागेचा शोध सुरू केला होता. मात्र ही सभा फेब्रुवारी महिना अखेरीस घेण्याचे नियोजन आखले जात आहे.

ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी सकाळी महापालिकेत सभागृहनेते संजय कोळी यांची भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जानेवारी रोजी सोलापुरात विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले गेले. देशाचे पंतप्रधान एका चांगल्या कार्यक्रमासाठी आल्यावर असे कृत्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले, याची चर्चा झाली.त्यामुळे आता काँग्रेसच्या  राष्ट्रीय नेत्याचे स्वागत करण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत, असा इशारा या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी नगरसेवक विनायक विटकर, रवी कैय्यावाले, राजकुमार काकडे आदी उपस्थित  होते. 

पार्कवर सभा घेऊन दाखवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर कार्यक्रम झाला. याचपद्धतीने काँग्रेसने राहुल गांधी यांची पार्क स्टेडियमवर सभा घेऊन गर्दी करून दाखवावी असे आव्हान सभागृहनेते संजय कोळी यांनी दिले. काँग्रेसच्या पदाधिकाºयांना राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी कमी होण्याची भीती वाटल्याने छोट्या मैदानांचा शोध सुरू केला आहे असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :SolapurसोलापूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण