शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

राफेल, नोटबंदीवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल; बार्शीत काँग्रेसची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 10:43 AM

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

ठळक मुद्देसर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा - डॉ. पद्मसिंह पाटील  सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ -डॉ. पद्मसिंह पाटील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले - डॉ. पद्मसिंह पाटील

बार्शी : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले आहेत. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पदाधिकाºयांनी बार्शी येथे घेतलेल्या सभेतून केला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.

यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवनदत्त आरगडे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या  शंभर चुका झाल्या आहेत. राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, क्लिष्ट करुन टाकलेली जीएसटी, सर्वसामान्यांचा अंत पाहणारी नोटबंदी, फसवी कर्जमाफी, पीकविम्याच्या बाबतीत कंपनी धार्जिणे धोरण, इंधन, गॅसचे  गगनाला भिडलेले दर, या बाबी सरकारचा भ्रष्ट व अपयशी कारभार स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत, सर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा, असे आवाहन त्यांनी मतदारांनी केले.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, शहर उपाध्यक्ष, निलेश मांजरे पाटील, इस्माईल पठाण, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष सचिन तूपसमिंदर, बार्शी शहर महिला अध्यक्षा सुमन महाजन, महिला संघटक अ‍ॅड. निवेदिता आरगडे तालुका सेवा दल अध्यक्षा शीलाताई हिंगे, महिला सेवा दल शहर अध्यक्षा सुनीता गायकवाड, विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी शहर अध्यक्ष केशव मुकटे, प्रवक्ते प्रा. पंकज पवार, जहिर बागवान, ईश्वर व्हनकळस उपस्थित होते.

भावनिक बोलून विकास होत नाही : पद्मसिंह पाटील- महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, केवळ भावनिक बोलून, घराणेशाहीवर विकास होत नसतो़ आम्ही नैसर्गिक संकटांना तोंड देवून पाटबंधाºयाचे अनेक प्रकल्प निर्मिले़ तेरणाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणली़ आज त्याचे वाटोळे कोणी केले, हे उस्मानाबादच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरosmanabad-pcउस्मानाबादcongressकाँग्रेसBJPभाजपाRafale Dealराफेल डीलNote Banनोटाबंदी