शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खेळाडूंना गुणवत्ता प्रशिक्षण

By admin | Updated: April 27, 2015 00:17 IST

क्रीडा संघटना सरसावल्या: जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग

सांगली : महाराष्ट्राला मातब्बर खेळाडू देणारी क्रीडापंढरी सांगली आता क्रीडा मानसशास्त्र व तंत्रशुध्द प्रशिक्षणाकडे वळत आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णाकाठच्या ‘स्पोर्टस् टॅलेन्ट’ला लाल मातीतील गुणवत्तेचे धडे देण्यासाठी आता जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनाच सरसावल्या आहेत. या विविध खेळांच्या संघटनांनी एकत्र येऊन क्रीडा गुणवत्ता प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ३ ते १५ मेदरम्यान हे प्रशिक्षण पार पडणार आहे. खेळाडू घडण्यासाठी केवळ धष्टपुष्ट शरीर असून चालत नाही. त्या शरीरात तितक्याच ताकदीचे सशक्त मन असावे लागते. आपले खेळाडू नेमके कुठे मागे पडतात?, स्पर्धेतील पराभवाची कारणे काय?, शारीरिक क्षमतेचा खेळाशी काय संबंध?, स्पर्धेपूर्वी खेळाडूची तयारी कशी असावी?, योग्य आहार व व्यायाम, क्रीडा मानसशास्त्र आणि तंत्रशुध्द प्रशिक्षण आदी विषयांवर जिल्'ातील विविध खेळांच्या संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीतून एका नवीन संकल्पनेचा उदय झाला. ही संकल्पना म्हणजे ‘क्रीडा गुणवत्ता प्रशिक्षण’.समाजातील सर्व स्तरातील खेळाडूंना त्यांना आवडेल त्या खेळांचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध खेळांच्या क्रीडा संघटना धाडसाने पुढे आल्या आहेत. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानेही हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पहिल्या टप्प्यात जिम्नॅस्टिक, अ‍ॅक्रोबॅटिक्स, मल्लखांब, थांगता, तायक्वांदो, चॉकबॉल, जलतरण, योगासन, स्पोर्टस् डान्स आदी खेळांचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यामध्ये दीपक सावंत, उमेश बडवे, प्रताप पाटील, सुरेश चौधरी, डॉ. सुहास व्हटकर, उदयकुमार पाटील, शंकर भास्करे, सुनील कोळी, सुधाकर जमादार, संजय जाधव, काजल काळे, हेमंत सावंत हे राष्ट्रीय प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण प्रमुख म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची निवड झाली आहे. गुणवत्ता, क्रीडा मानसशास्त्र, संशोधन व प्रथमोपचार या चार गोष्टींवर या प्रशिक्षणात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व शॉर्ट देण्यात येणार आहे. नवोदित विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाधिकारी नाईक यांनी व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)