पोलिसांना धक्काबुक्की करून दोघे वाळूचा टेम्पो घेऊन पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST2021-09-21T04:24:55+5:302021-09-21T04:24:55+5:30

याबाबत पोलीस नाईक धनंजय आवताडे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण चोरमुले (रा. खारवटवाडी, सांगोला) व एका अनोळखी ...

Pushing the police, the two pass by with a tempo of sand | पोलिसांना धक्काबुक्की करून दोघे वाळूचा टेम्पो घेऊन पसार

पोलिसांना धक्काबुक्की करून दोघे वाळूचा टेम्पो घेऊन पसार

याबाबत पोलीस नाईक धनंजय आवताडे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण चोरमुले (रा. खारवटवाडी, सांगोला) व एका अनोळखी व्यक्तीवर भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक धनंजय आवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमुले हे सोमवारी पहाटे वाढेगाव बीटमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यांना बातमीदारामार्फत मेडशिंगी शिवारातील नदीपात्रातून एक टमटम वाळू भरून जुन्या मेडशिंगी रोडने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विना नंबरचा टेम्पो गणेश सोनलकर यांच्या घरासमोरील रोडवर आला असता चालकास थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी टेम्पोच्या हौदात पाहिले असता अर्धा ब्रास वाळूसह अनोळखी व्यक्ती मिळून आली. यावेळी पोलिसांनी त्यास टेम्पो मालकाचे नाव विचारले असता पोलिसांना धक्काबुक्की करून टेम्पो घेऊन निघून गेले. दरम्यान, पोलिसांनी पळवून नेलेला विना नंबर टेम्पोसह मालकाचा शोध घेतला असता मिळून आले नाहीत.

Web Title: Pushing the police, the two pass by with a tempo of sand