Push the Warkari sect; Ramdas Maharaj Jadhav died in Corona | वारकरी संप्रदायाला धक्का; रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

वारकरी संप्रदायाला धक्का; रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर : पंढरपूरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त हभप रामदास महाराज जाधव - कैकाडी (वय ७७) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले..

ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू होते. ह.भ. प. रामदास महाराज हे मूळ मनमाडचे आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. ह.भ.प  रामदास महाराज जाधव यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान होते. यामुळे त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Push the Warkari sect; Ramdas Maharaj Jadhav died in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.