दर वाढतील म्हणून अधिक महिन्याची खरेदी; अक्षयतृतीयेलाच घेतली जावयांसाठी चांदी
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 23, 2023 17:33 IST2023-04-23T17:31:28+5:302023-04-23T17:33:47+5:30
अधिक महिना काही दिवसांवर (जुलै) येऊन ठेपला असून सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

दर वाढतील म्हणून अधिक महिन्याची खरेदी; अक्षयतृतीयेलाच घेतली जावयांसाठी चांदी
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : अधिक महिना काही दिवसांवर (जुलै) येऊन ठेपला असून सोने-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. काही हुशार मंडळींनी जावई लोकांना खूश करण्यासाठी अक्षय तृतीयेदिनीच चांदीच्या वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये निरंजन, गाय-वासरू, ताट अशा वस्तूंचा समावेश होता.
अक्षय तृतीयेला चांदीचे क्वाईन, बिस्कीटांची खरेदी झाली. पायाच्या करंगळीत घालण्यासाठी बिच्छवा आणि अंगठ्याच्या बाजुला लक्ष्मी बोटात घालण्यासाठी जोडवी देखील पुष्कळ व्हरायटीत उपलब्ध झाले. पैंजन, कडा पैंजन, मराठमोळा दागिना म्हणून पाहिल्या जाणारा कोल्हापुरी साज, बारीक पातळ चेन असे अनेक प्रकार पाहायला मिळाले.
परतावा २० टक्के अधिक
मागील वर्षाच्या तुलनते यंदा चांदीचा परतावा २० टक्के अधिक आहे. मागील अक्षय तृतीयेला सोन्याचा दर ५३ हजारांवर होता. यंदा ६० हजार ४०० रुपयांवर स्थिरावला. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्यातील परतावा हा ७ हजार ४०० रुपयांनी (१४ टक्के) अधिक होता. तसेच मागील वर्षी चांदीचा दर ६२ हजार रुपये होता तर यंदा ७४ हजार रुपये (१४ टक्के) किलो राहिला.
यंदा चांदीतून परतावा ग्राहकांना शेअर मार्केटपेक्षा अधिक मिळतोय. दुसरीकडे दरवाढीच्या शक्यतेने काही लोक अधिक महिन्यात जावई-मुलीसाठी दिली जाणारी चांदीची भेटवस्तूही अक्षय तृतीयेलाच खरेदी केली. - गिरीश किवडे, सराफ व्यवसायिक
सहा महिन्यात वृद्धी
सप्टेंबर २०२२ : ५८००० रु.
ऑक्टोबर २०२२ : ५९,५०० रु.
नोव्हेंबर २०२२ : ६१,७०० रु.
डिसेंबर २०२२ : ६५००० रु.
जानेवारी २०२३ : ६८,५०० रु.
फेब्रुवारी २०२३ : ६९००० रु.
मार्च २०२३ : ६९,८०० रु.
एप्रिल २०२३ : ७४००० रु.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"