पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; हे कागदपत्रे असतील तरच करता येणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 07:26 PM2020-11-17T19:26:24+5:302020-11-17T19:26:32+5:30

सोलापूर लोकमत विशेष...

Pune Division Graduates, Teachers Constituency Election; Voting can only be done if these documents are available | पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; हे कागदपत्रे असतील तरच करता येणार मतदान

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; हे कागदपत्रे असतील तरच करता येणार मतदान

googlenewsNext

सोलापूर : विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठीमतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू न शकणा-या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड तसेच पारपत्र आदी नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 

या कागदपत्रांबरोबरच केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर/शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदविका मूळ प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित कराव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे अथवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधित अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांनी नोंद घ्यावी, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मृणालिनी सावंत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Pune Division Graduates, Teachers Constituency Election; Voting can only be done if these documents are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.