शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचा खळाळता प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:45 IST

पोलीस बंदोबस्त वाढविला; निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी दररोज तीन हजार पर्यटकांची गर्दी

ठळक मुद्देपुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरण भरले़निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी शाळा व कॉलेजच्या तरुण धरणाकडे धरणातील फेसाळते पाणी, हवेतील थंंडावा आणि मनोहारी दृश्य

भीमानगर : सहा आॅगस्ट रोजी उजनी धरण भरले. येथील निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची उजनी धरण परिसरात एकच गर्दी झाली आहे. यामुळे धरण प्रशासनावर ताण तर वाढलाच, शिवाय पोलीस बंदोबस्तही वाढवावा लागला आहे. 

पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरण भरले़ हे पाणी पुढे सोडावे लागले़ आॅगस्ट महिन्यात सुट्या जोडून आल्याने निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी शाळा व कॉलेजच्या तरुण वर्गानेही धरणाकडे धाव घेतली़ नोकरदार, विद्यार्थी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरून जाताना वळून धरणाकडे धाव घेत आहेत. या परिसरात फोटोसेशन, सेल्फी रंगलेला दिसतोय. धरणातील फेसाळते पाणी, हवेतील थंंडावा आणि मनोहारी दृश्य अनुभवताहेत. विशेषत: सहकुटुंब हा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत आहे.

परिणामत: या परिसरात हॉटेल व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे. दिवसभरात जवळपास तीन हजार पर्यटक उजनी धरण पाहण्यासाठी येत आहेत. धरण परिसरात छोटे-मोठे हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाºया व्यावसायिकांनीही गर्दी केली आहे. पर्यटकांकडून धरणाचे कौतुक होतंय.

हिरवळ खुणावतेय...- सध्या श्रावणधारांनी उजनी धरण परिसरात हिरवळ दाटली आहे. चोहीकडे या परिसराने निसर्गाला जणू हिरवा शालू परिधान केल आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी आले की बराच वेळ थांबावेसे वाटते आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थही उपलब्ध होत असल्याने पर्यटकांची चांगलीच व्यवस्था झाली आहे़ बहुतांश पर्यटक हे दुचाकी आणि चारचाकी घेऊन परिसरात सहकुटुंब दाखल होताहेत़ 

उजनी धरण व्यवस्थापन विभागाने या ठिकाणी कोयना धरणाच्या धर्तीवर उजनीवर पर्यटकांसाठी मोठी बागबगिचा निर्माण करावी़ तसेच कारंजा, स्लाईड शो निर्माण करावा़ पुणे-सोलापूर हायवेलगत हे धरण असल्याने शासनाला मोठा महसूल मिळू शकतो.- अंबादास कोथाळे, पर्यटक, पुणे 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणTravel Tipsट्रॅव्हल टिप्सwater parkवॉटर पार्क