राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुध्द सोलापुरातही निदर्शने, वक्तव्याचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:43 IST2022-11-20T13:42:53+5:302022-11-20T13:43:05+5:30
राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरातही उमटले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुध्द सोलापुरातही निदर्शने, वक्तव्याचे पडसाद
राकेश कदम
सोलापूर :
राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरातही उमटले. काेश्यारी यांच्याविरुध्द राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी निदर्शने केली. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात जमले. कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काेश्यारी यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी करीत निदर्शने केली.
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर म्हणाले, राज्यपाल काेश्यारी यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत. कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवरायांचा आदर्श एका काळापुरता नाही तर सदैव राहणार आहे. काेश्यारी यांनी यापूर्वीही बहुजन समाजाच्या महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले. काेश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे. भाजप नेत्यांनी त्यांना पाठिशी घालण्याचे काम करू नये.यावेळी व्यसनमुक्ती सेलचे ज्योतिबा गुंड, निशांत सावळे, संपन्न दिवाकर, रुपेश भोसले, अक्षय जाधव, मुसा अतार, बिरप्पा बंडगर, मयूर रचा, संदीप साळुंखे, श्रवण ढवलगे, सचिन चलवादी, लखन गावडे, महेश कुलकर्णी, गणेश छत्रबंद, कुमार हलकट्टी, विशाल सावंत आदी उपस्थित होते.