राणेंचा चित्राद्वारे बैल बनवून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:36+5:302021-08-25T04:27:36+5:30

वाघोली : युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांचा चित्ररूपी बैल बनवून त्यांच्या मुख्यमंत्री विरोधी ...

Protest by making Rane a bull through a picture | राणेंचा चित्राद्वारे बैल बनवून निषेध

राणेंचा चित्राद्वारे बैल बनवून निषेध

वाघोली : युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांचा चित्ररूपी बैल बनवून त्यांच्या मुख्यमंत्री विरोधी वक्तव्याचा निषेध नाेंदवला.

तालुका प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना अकलूज शहरप्रमुख शेखर खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली संगम येथे हा निषेध नोंदवण्यात आला. नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या विधानाचे पंढरपूर परिसरात पडसाद उमटले. आंदोलनादरम्यान माळशिरस तालुका युवा सेना तालुकाप्रमुख गणेश इंगळे, अकलूज शहरप्रमुख शेखर भय्या खिलारे, अकलूज शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब भोसले, आजिनाथ इंगळे, काकासाहेब भोई, नाना पराडे, नवनाथ इंगळे, रामभाऊ इंगळे गणेश गायकवाड, दयानंद इंगळे पिंटू भोई, अशोक भोई, लालासाहेब भोई, बालाजी गायकवाड, नितीन इंगळे, सचिन इंगळे, प्रशांत इंगळे, विकास भाई, अविनाश भाई, दीपक भाई, सचिन भोई, ओम पराडे , ओम गायकवाड, शिवराज पराडे, बबलू इंगळे युवा सैनिक उपस्थित होते.

----

Web Title: Protest by making Rane a bull through a picture