शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

विनाअनुदनित शाळांवरील शिक्षकांच्या मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 12:49 IST

सरकारविरोधात रोष; न्याय मागण्यासाठी शिक्षक उतरणार रस्त्यावर

सोलापूर : विनाअनुदानित शाळांवरील हजारो शिक्षकांच्या संसाराची राख रांगोळी गेल्या वीस वर्षांत झाली आहे. मंत्रालय स्तरावर ३९६१ शिक्षक अनुदानास पात्र आहेत, त्रुटीपात्र शाळांचा शासन निर्णय तयार आहे. प्रचलित सूत्राची फाईल तयार आहे. या मागण्या मान्य झाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल. शिंदे सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा १० ऑक्टोबर २०२२ २०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन करण्याचा इशारा पुणे विभाग कार्याध्यक्ष सरफराज बलोलखान यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ कमवी शिक्षक शिक्षकेतर संघटना आयोजित शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक संवाद मेळावा इंदिरानगर विजापूर नाका सोलापूर येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे झाला. या मेळाव्याप्रसंगी बलोलखान बोलत होते. या मेळाव्याला पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. 

यावेळी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचे राज्य अध्यक्ष दीपक कुलकर्णी, राज्य कार्याध्यक्ष संतोष वाघ, राज्य सदस्य अनिल परदेशी, उपाध्यक्ष राहुल कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रमुख के. पी. पाटील, नेहाताई गवळी, सुजाता खट्टे, ज्ञानेश्वर शेळके, प्रा. देविदास जगताप, प्रा. मारुती खरात, प्रा. अमर उमाटे, अनिलकुमार धायगुडे, पुणे विभाग अध्यक्ष प्रा. गणेश फलके, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

---------

मेळाव्यात ठराव; १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन

या मेळाव्यास सुमारे शेकडो शिक्षक उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व पुणे या पाचही जिल्ह्यांतील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित, अघोषित २० टक्के, ४० टक्के, त्रुटी पात्र या सर्व स्तरावरील शिक्षक हजर होते. याचवेळी पुणे विभागाचे सचिव गंगाधर पडणुरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी १० ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

------------

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणTeacherशिक्षक