भाकपतर्फे बार्शीत इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:24+5:302021-07-09T04:15:24+5:30

बार्शी : पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढत्या महागाईमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनेच्या वतीने बार्शी तहसील ...

Protest against fuel price hike by BJP | भाकपतर्फे बार्शीत इंधन दरवाढीचा निषेध

भाकपतर्फे बार्शीत इंधन दरवाढीचा निषेध

बार्शी : पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व वाढत्या महागाईमुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनेच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकरविरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी श्रमिक, आदिवासी शेतकरी चळवळीचे नेते भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात जेलमध्ये मृत्यू पावलेले स्टॅन स्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ए. बी. कुलकर्णी, सुरेखा शितोळे यांच्या शिष्टमंडळाने नायब तसीलदार संजीवन मुंडे यांची भेट घेऊन मागणीचे निवदेन दिले. आंदोलनासाठी तानाजी ठोंबरे, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, धनाजी पवार, भारत भोसले, लक्ष्मण घाडगे, आनंद धोत्रे, बालाजी शितोळे, किसन मुळे, जयवंत आंबिले, सुनील सालसकर, संदीप तुपे, संगीता गुंड, निर्मला सरवदे, विकास पवार, आयाज शेख, तुषार कांबळे सहभागी झाले होते.

Web Title: Protest against fuel price hike by BJP