दहा लाखांसाठी जाचहाट : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:21+5:302021-09-12T04:27:21+5:30

वैराग : लग्नानंतर आठच दिवसांत व्यवसायासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासरा, सासू, नणंद ...

Prosecution for Rs 10 lakh: Crime filed against four | दहा लाखांसाठी जाचहाट : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दहा लाखांसाठी जाचहाट : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैराग : लग्नानंतर आठच दिवसांत व्यवसायासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासरा, सासू, नणंद यांच्या विरुद्ध वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सद्दाम सय्यद यांनी (वय २३, रा. वैराग) यांनी फिर्याद दिली आहे. वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नजीर अल्लाबक्ष शेख (रा. घाणेगाव, ता. बार्शी) यांची मुलगी रेश्मा हिचा जिलानी शहाबुद्दीन सय्यद (रा. बारबोले प्लॉट, बार्शी) यांचा मुलगा सुद्दाम याचे बरोबर २ जुलै २०१६ रोजी लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर आठ दिवसांपासून १ सप्टेंबर २०२१ पर्यंत पती सद्दाम जिलानी सय्यद, सासरा जिलानी सय्यद, सासू परवीन जिलानी सय्यद व नणंद हिना सय्यद यांनी व्यवसायाकरिता दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून जाचहाट केला. उपाशी पोटी ठेवले.

Web Title: Prosecution for Rs 10 lakh: Crime filed against four