अतिक्रमण विभागाची कारवाई; अवंती नगरातील फुटपाथवरील टपऱ्या उचलल्या
By Appasaheb.patil | Updated: July 18, 2023 15:35 IST2023-07-18T15:34:59+5:302023-07-18T15:35:16+5:30
अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अतिक्रमण विभागाची कारवाई; अवंती नगरातील फुटपाथवरील टपऱ्या उचलल्या
सोलापूर : अवंती नगरात फुटपाथवरील चायनीज सेंटर, भेळ हाऊस, भजी, दाल-चावलच्या चार टपऱ्या व खोके सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने जप्त करून कारवाई केली. यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने कारवाई यशस्वी झाली.
अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अवंती नगरात फुटपाथवर काही विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने, स्टॉल थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती.
या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने मंगळवारी भर पावसात कारवाईची मोहिम हाती घेतली. या कारवाईत चार खोके जप्त केले आहे. या कारवाईवेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी विरोधाला न जुमानता कारवाईची मोहीम यशस्वी केली.