प्रियदर्शनीची नवी श्री व सौ यूपोलीस शाखा बार्शीकरांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST2021-07-29T04:23:33+5:302021-07-29T04:23:33+5:30

पुणे-मुंबई येथील नामवंत कंपनीची दालने आणि मॉल्समध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑफर्स त्या त्या दिवशीच बार्शी शहरातही देण्यात येणार आहेत. ...

Priyadarshani's new Mr. and Mrs. Upolis branch in the service of Barshikar | प्रियदर्शनीची नवी श्री व सौ यूपोलीस शाखा बार्शीकरांच्या सेवेत

प्रियदर्शनीची नवी श्री व सौ यूपोलीस शाखा बार्शीकरांच्या सेवेत

पुणे-मुंबई येथील नामवंत कंपनीची दालने आणि मॉल्समध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑफर्स त्या त्या दिवशीच बार्शी शहरातही देण्यात येणार आहेत. उद‌्घाटनानिमित्ताने मुफ्ती ब्रँडच्या दोन खरेदीवर १ फ्री, यूपोलीसच्या ३९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट, ५९९९ रुपयांच्या खरेदीवर १००० रुपयांची सूट, ॲरो ब्रँडवर सरसकट २० टक्क्यांची सूट, स्पायकर ब्रँडच्या २ खरेदीवर १ फ्री, महिलांसाठी १ साडी खरेदीवर २ साड्या मोफत तसेच १ वर १ फ्री अशा विविध ऑफर्स दिल्या आहेत.

या ठिकाणी पुरुषांसाठी हजार स्क्वेअर फुटांच्या स्वतंत्र दालनात यूपोलीस ब्रँडच्या माध्यमातून मुफ्ती, स्पायकर, यूएसपोलो, ॲरो नावांचे आंतरराष्ट्रीय ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. महिलांसाठी दोन हजार स्क्वेअर फुटांच्या स्वतंत्र प्रशस्त दालनात सिल्क व डिझायनर साड्यांची शंभर रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण व्हरायटी उपलब्ध आहे. डिझायनर प्रकारात लक्ष्मीपती, सुभाष, विशाल, अंबिका अशा विविध ब्रँडेड कंपन्यांच्या साड्या उपलब्ध आहेत. सिल्कमध्ये धर्मावरम, कांजीवरम, ब्रोकेट, येवला पैठणी, नारायणपेठ, इरकल, फॅन्सी इरकल, बागलपुरी, बांबू सिल्क, खणाची साडी अशा मनमोहक व आकर्षक डिझाइनची उत्पादने हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. (वा.प्र.)

Web Title: Priyadarshani's new Mr. and Mrs. Upolis branch in the service of Barshikar