शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

खासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:38 PM

खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात 

ठळक मुद्देशासनाला सर्व काही माहिती असूनही बघ्याची भूमिका - दशरथ मानेदूध व्यवसायाबाबत अज्ञानी व अनुभव नसलेले लोक सत्तेत - ज्ञानेश्वर पवार

अरुण बारसकर सोलापूर : दूध खरेदीचे दर पुन्हा दोन रुपयांनी कमी केल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली असून आता गायीच्या दुधाला प्रति लिटर १७ रुपयांचा दर मिळणार आहे. पावडरचे दर घसरल्याचे कारण असले तरी शेतकºयांनी करायचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विक्री दुधाचे दर ४२ वरून ३८ रुपये केल्याचेही सांगण्यात आले.

 जून २०१७ पासून शासनाने गायीच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपयांचा दर देण्याचा आदेश काढला होता. मात्र त्यानुसार दर देण्यास खासगी संघांनी नकार देत उलट असलेला प्रति लिटर २५ रुपयांचा दर  कमी केला.  शासन आदेशानुसार दर देणे शक्य नसल्याची खासगी संघांनी मागील वर्षी घेतलेली भूमिका आजही कायम असून शासन मात्र यावर ठोस भूमिका घेत नाही. यामुळे मागील वर्षी प्रति लिटर २५ रुपये असलेला दर यावर्षी १७ रुपयांवर आला आहे. 

इंदापूर येथील सोनाई डेअरीने तसे ९ जून रोजी दूध पुरवठादार संस्थांसाठी लेखी आदेशच काढले आहेत.  ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. असलेल्या दुधाचा दोन रुपयांनी दर कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दूध पावडरचा साठा अतिरिक्त झाल्याने पावडरला प्रति किलो ३० रुपयांचे नुकसान तर दुधावर प्रति लिटर ३ रुपयांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. दूध खरेदीदर प्रति लिटर १९ रुपयांवरून १७ रुपये करण्याचा निर्णय घेत असताना विक्रीचे दरही कमी केले आहेत. 

दूध विक्रीचा दर प्रति लिटर ४२ रुपये होता, तो ३८ रुपये करण्याचा निर्णय घेतला असून दूध पिशवीवर एम.आर.पी. ४२ रुपयांऐवजी ३८ रुपये छापण्यात येणार असल्याचे सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले. 

‘महानंद’ही याच मार्गाने- शासनाचा महानंदही याच मार्गाने जात असून खासगी संघांनी दूध खरेदीदर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महानंदची बैठक १९ जून रोजी होणार आहे. या बैठकीत दूध खरेदीदर कमी करण्याच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. परवडत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संचालक ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले. 

यापेक्षाही दर कमी करावा लागणार आहे. शासनाला सर्व काही माहिती असूनही बघ्याची भूमिका घेत नाही. दर कमी करण्याचा निर्णय हा सर्व खासगी संघांनी एकत्रितरित्या घेतला आहे.दशरथ माने- सोनाई डेअरी, इंदापूर

दूध व्यवसायाबाबत अज्ञानी व अनुभव नसलेले लोक सत्तेत बसले आहेत. त्यांना शेतकºयांचे दु:ख समजत नाही. शेतकºयांसाठी मारक धोरण राबवित असल्याने दूधदर कमी होत आहेत.- ज्ञानेश्वर पवार,संचालक, महानंद 

१७ रुपयांचे दूध ३८ रुपयांनी विकते

  • - शेतकºयांकडून १७ रुपयांनी खरेदी केलेले दूध इंदापूरला पोहोच करण्यासाठी दोन रुपयांचा खर्च असे संस्थांना प्रति लिटर १९ रुपये दिले जाणार आहेत. हे दूध ग्राहकांना प्रति लिटर ३८ रुपयांनी विक्री केले जाणार आहे. आतापर्यंत शेतकºयांकडून १९ रुपये प्रति लिटर खरेदी केलेले दूध ग्राहकांना ४२ रुपयांनी मिळत होते. 
टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMahadev Jankarमहादेव जानकर