आलेगावच्या लोखंडे कुटुंबाला पंतप्रधान जीवनज्याेतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST2021-09-08T04:28:47+5:302021-09-08T04:28:47+5:30

सोलापूर : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी आणि स्टार युनियन दाई-इची लाईफच्या वतीने पंतप्रधान जीवनज्योती विमा अंतर्गत आलेगाव येथील ...

Prime Minister's life benefit to the Lokhande family of Alegaon | आलेगावच्या लोखंडे कुटुंबाला पंतप्रधान जीवनज्याेतीचा लाभ

आलेगावच्या लोखंडे कुटुंबाला पंतप्रधान जीवनज्याेतीचा लाभ

सोलापूर : बँक ऑफ इंडिया शाखा आहेरवाडी आणि स्टार युनियन दाई-इची लाईफच्या वतीने पंतप्रधान जीवनज्योती विमा अंतर्गत आलेगाव येथील अंबुबाई बाळासाहेब लोखंडे यांना दोन लाखांचा धनादेश बँकेचे व्यवस्थापक राहुल घोडके यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. अंबुबाई यांचे पती बाळासाहेब लोखंडे यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला बँक ऑफ इंडियाकडून पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी सुनील चिट्टेकर, सुनील पवार, साई महेर, सागर देशमुख, संदेश रोजे, बँक ऑफ इंडियाचे राजशेखर शिवशरण-पाटील, प्रवीण कांबळे, प्रकाश लाेखंडे आणि आहेरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

----------

फोटो : ०७ बीओई

पंतप्रधान जीवनज्याेती विमा याेजनेच्या लाभाचा धनादेश अंबुबाई लाेखंडे यांना प्रदान करताना राहुल घोडके, सुनील चिट्टेकर, सुनील पवार, सागर देशमुख.

Web Title: Prime Minister's life benefit to the Lokhande family of Alegaon