करकंबच्या भटजींचे ऑनलाइनद्वारे अमेरिकेत पौरोहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:57+5:302021-07-02T04:15:57+5:30
पुणे येथील रहिवासी असलेले सचिन जाधव हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले आहेत. जाधव यांनी अमेरिकेत स्वतःचे घर विकत घेतले. वास्तुशांतीचा ...

करकंबच्या भटजींचे ऑनलाइनद्वारे अमेरिकेत पौरोहित्य
पुणे येथील रहिवासी असलेले सचिन जाधव हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले आहेत. जाधव यांनी अमेरिकेत स्वतःचे घर विकत घेतले. वास्तुशांतीचा कार्यक्रम करण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित असला तरच कार्यक्रमाला शोभा येते. शिवाय रीतीरिवाजानुसार आपल्या कार्यक्रमात या सर्व मंडळींची हजेरी असणे महाराष्ट्राची संस्कृती मानली जाते.
दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य आहे. मग भारतातून अमेरिकेत जाणे तर मुश्किलच आहे. अशा परिस्थितीत छोटे-मोठे कार्यक्रम घेण्यावरही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जाधव यांनी याबाबत नातेवाईक आणि मित्र परिवाराशी सल्लामसलत केली. त्यावर सर्वानुमते ऑनलाइन पूजा करण्याचा निर्णय घेतला आणि करकंब येथील केदार जोशी यांच्याकडून झूम ॲपच्या माध्यमातून पूजविधीचा कार्यक्रम पार पाडत महाराष्ट्राची संस्कृती अमेरिकेत जोपासण्याचे काम केले.
कोट :::::::::::::
मी यापूर्वी पुणे येथील एका कार्यक्रमाचे ऑनलाइन पौरोहित्य केले होते. परंतु येथून अमेरिकेचे ऑनलाइन पौरोहित्य केल्याचा वेगळाच आनंद वाटला.
- केदार जोशी, भटजी, करकंब