शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

शेणालाही मिळतोय बक्कळ दर, एक ब्रासची किंमत आता तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:30 PM

शेतात खत म्हणून वापर : जैविक शेतीवर भर, पशुधनात घट झाल्याने वाढला भाव

सोलापूर : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता घसरत चालली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी शेतकरी मुख्यतः शेणखताचा वापर करत आहेत. मात्र, यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची पशुधनात होणारी घट यामुळे शेणखताला सध्या सोन्याचा भाव आला आहे. सोलापुरात एक ब्रास शेणखत तीन हजार रुपयांना विकले जात आहे.

यामुळे पूर्वी गावशिवारात सहज मिळणारे शेणखत आता अधिक दरात मिळत आहे. सोलापुरात मजरेवाडी येथील शेतकरी अमित लामखाने या शेतकऱ्याने आपल्या शेतात सेंद्रिय पिकांची लागवड केली असून, त्यांच्या घरी २० पाळीव म्हशी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचा वापर शेणखत म्हणून करीत आहेत, तर राहिलेल्या शेणखताची विक्री सोलापूर, मोहोळ, बार्शी, माढा आणि करमाळा याठिकाणी करतात.

 

यांत्रिकीकरण, गाय, म्हैस, बैल, शेळ्या अशा पशुधनाच्या किमती वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत, तर अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळेही शेणखताची मागणी वाढली आहे. पूर्वी एक हजार ते दीड हजार रुपये ट्रॅक्टर-ट्रॉली या दराने शेणखत मिळत होते, ते सध्या चार हजार ते पाच हजार ट्रॉलीप्रमाणे मिळत आहे.

असा होतो शेणखताचा फायदा....

गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. वापराने जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि विषमुक्त धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. शेणखतामुळे वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकांना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे पीक वाढीच्या काळात सतत अन्नपुरवठा कायम राहतो.

 

माझ्याकडे २० म्हशी असून, त्यांच्या शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा यापासून जे खत तयार होते, ते आम्ही शेतात वापरतो, राहिलेले शेणखताची विक्री करतो, लॉकडाऊननंतर शेणखताची मागणी सोलापूर आणि परिसरातून वाढली आहे.

- अमित लामकाने, पशुपालक शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी