शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात शिवजन्मोत्सवाची तयारी; लेझीमच्या लाईटिंगमध्ये शिवभक्ती उजळली; सोलरच्या चॉर्जिंग दिव्यांची कल्पना चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 15:19 IST

सोलापूर : शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी लेझीमचा सराव... सरावावेळी तरुणाईचा उत्साह अधिक द्विगुणित व्हावा, यासाठी दिवसा सूर्यकिरणांनी चॉर्जिंग झालेले बल्व लेझीमच्या ...

ठळक मुद्देजागृत शिवजन्मोत्सव मंडळाचा उपक्रम अन्य शिवजयंती मंडळांच्या लेझीमच्या सरावाला गतीसोलर पॅनलसह लहान बॅटरी संच बसवून लेझीमला प्रकाशमय

सोलापूर : शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी लेझीमचा सराव... सरावावेळी तरुणाईचा उत्साह अधिक द्विगुणित व्हावा, यासाठी दिवसा सूर्यकिरणांनी चॉर्जिंग झालेले बल्व लेझीमच्या दोन्ही दांड्यात बसवून चाललेल्या सरावात तरुणाई उजळून निघत आहे. शाहीर वस्ती येथील जागृती शिवजन्मोत्सव मंडळाचा हा सराव पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. 

मंडळाचे ५०० ते ६०० कार्यकर्ते या अनोख्या लेझीमसह जोशपूर्ण विविध डाव, पैतरे सादर करणार आहेत. अशाप्रकारे एलईडी लेझीम सादर करणारे जागृती मंडळ हे सोलापुरातील पाहिले मंडळ होय. नवनवीन उपक्रम करण्यात अग्रेसर असलेल्या जागृती मंडळाचे कार्यकर्ते सुजित पवार यांना ही कल्पना सुचली.

घरातील देवीच्या, महाराजांच्या फोटोला एलईडी लायटिंग आहे तर लेझीमला का होऊ शकत नाही, असा विचार करीत, सोलर पॅनलसह लहान बॅटरी संच बसवून लेझीमला प्रकाशमय केले. दिवसभर उन्हात हे सर्व लेझीम चार्ज केले जातात आणि रात्री सरावासाठी काढले जातात. रूपभवानी मंदिराकडून सम्राट चौकाकडे जाताना वर्धमान नगर येथे दररोज जागृती मंडळाचे कार्यकर्ते या लेझीमसह सराव करताना दिसून येतात.

रात्री सादर होणारे लेझीमचे डाव, पैतरे रात्रीच्या अंधारात जणू काजव्यांचे चमकदार नृत्य सादर होत असल्याचा भास होतो. दिमाखदार सोहळा साजरा करण्यासाठी यंदा जागृती मंडळाने शंभर महिलांच्या पारंपरिक वेशभूषेसह महाराष्ट्रातील पंधरा पुरोहितांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चार करीत महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती साकारणारे एकमेव मंडळ आहे. सामाजिक कार्याचा वसा या मंडळाने घेतला आहे.

वेगळा उपक्रम राबवताय ? पाठवा मेसेज..उत्सवप्रिय सोलापूर जिल्ह्यात शिवजन्मोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरु झालीय. अनेक मंडळे, सामाजिक संस्थांकडून शिवरायांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी अनेक विधायक उपक्रम हाती घेतलीत. या सर्व चांगल्या उपक्रमांना ‘लोकमत’ने ठळक प्रसिद्धी देण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. चला तर मग.. उचला मोबाईल अन् पाठवा माहिती..  9922427776 व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर

जागृती मंडळाचे सहाशेपेक्षा अधिक कार्यकर्ते  असून, चारशे एलईडीसह लेझीम तयार झाले आहेत, दोनशे तयार होत आहेत. मिरवणुकीत रात्रीच्या अंधारात लेझीमसह प्रकाशाची झळाळी दिसावी, कार्यकर्त्यांना जोश येण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे.- संजय कोळी, जागृती मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज