नेदरलँडच्या इमॉस कंपनीवर सोलापूरच्या प्रिसिजनचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:16 IST2018-05-18T18:16:12+5:302018-05-18T18:16:12+5:30
नेदरलँड येथील इमॉस कंपनीचे ५१ टक्के समभाग खरेदी करून प्रिसिजनने ती कंपनी ताब्यात घेतली आहे़

नेदरलँडच्या इमॉस कंपनीवर सोलापूरच्या प्रिसिजनचा ताबा
सोलापूर : वाहनांना लागणाºया कॅमशॉफ्टसचे उत्पादन करणाºया सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशॉफ्टस या कंपनीने आता इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे़ नेदरलँड येथील इमॉस कंपनीचे ५१ टक्के समभाग खरेदी करून प्रिसिजनने ती कंपनी ताब्यात घेतली आहे़
पीसीएल इंटरनॅशनल होल्डिंग्ज बी़ व्ही़ या कंपनीच्या माध्यमातून प्रिसिजन कॅमशॉफ्टसने हा व्यवहार केला आहे़ इमॉस ही कंपनी ट्रक, बस, लष्करी तसेच अवजड वाहनांना इलेक्ट्रीक पॉवर ट्रेन्सचे उत्पादन करीत आहे़ या कंपनीत ७़३५८ मिलिटन युरो (५८ कोटी) रूपये गुंंतवून प्रिसिजनने ५१ टक्के समभाग खरेदी केले आहेत़ ४९ टक्के समभाग इमॉसकडेच राहणार आहेत़
प्रिसिजन कॅमशॉफ्टसची चेअरमन यतीन शहा, व्यवसाय विकासक करण शहा यांनी इमॉसचे एडविन व्होवेल, रेक्स व्होवेल यांच्याबरोबर हा व्यवहार करून इमॉस ताब्यात घेतली आहे़ गेल्या आठ महिन्यातील प्रिसिजनचे हे तिसरे संपादन असून या पूर्वी नाशिकची मेम्को, जर्मनीची एमएफपी या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत़