प्रवीण दरेकर यांचा निषेध, जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST2021-09-17T04:27:53+5:302021-09-17T04:27:53+5:30

सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणे महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणे, ही भाजपची परंपरा व संस्कृती आहे, हे तुम्हीच सिद्ध ...

Praveen Darekar's protest, Jodemaro movement | प्रवीण दरेकर यांचा निषेध, जोडेमारो आंदोलन

प्रवीण दरेकर यांचा निषेध, जोडेमारो आंदोलन

सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक देणे महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणे, ही भाजपची परंपरा व संस्कृती आहे, हे तुम्हीच सिद्ध केले आहे. ज्या भाजप महिला आहेत, त्यांनी दुसऱ्या पक्षातील लोकांची उणीदुणी काढण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना संस्कारांची शिकवणी सुरू करावी. हे बेताल वक्तव्य करणाऱ्या दरेकर यांनी महिलांची माफी मागावी. अन्यथा युवती तीव्र आंदोलन करतील. त्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिला.

यावेळी रंजना हजारे, श्रीया भोसले, साधना राऊत, अनिता पवार, शुभांगी जाधव, संगीता माने, सारिका गायकवाड, छाया खंडागळे, ऋतुजा चव्हाण, श्वेता देशपांडे, पूजा लवंगकर, प्राजक्ता परचंडराव, प्रीती घोरपडे, गिरीश चाकोते, सचिन आदमीले, स्वप्नील जगताप, सागर पडगळ आदी उपस्थित होते.

Web Title: Praveen Darekar's protest, Jodemaro movement