सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे सुशोभिकरण पाहून प्रणिती शिंदे झाल्या अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 15:49 IST2021-01-25T15:49:00+5:302021-01-25T15:49:00+5:30
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क स्टेडियमचे सुरू आहे सुशोभिकरण

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे सुशोभिकरण पाहून प्रणिती शिंदे झाल्या अवाक्
सोलापूर : स्मार्ट सिटींतर्गत शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आलेले सुशोभीकरण पाहून शहर मध्यच्या आ. प्रणिती शिंदे या आश्चर्यचकीत झाल्या. मैदानावर झालेल्या सर्व कामांची स्तुती करून भविष्यात आंतरराष्ट्रीय, रणजी व अन् राज्यस्तरावरील सामन्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. प्रणिती शिंदे या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी इंदिरा गांधी स्टेडियमला रविवारी भेट दिली. यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी झालेल्या कामांची आ. शिंदे यांना माहिती दिली. स्टेडियमवर होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, क्रीडाधिकारी नजीर शेख, तिरूपती परकीपंडला, अंबादास करगुळे, आदी उपस्थित होते.