शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रणिती शिंदेंना आले मुंबईचे बोलावणं; मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:52 IST

सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण; शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीत

ठळक मुद्दे- आमदार प्रणिती शिंदे तिसºयांदा आल्या शहर मध्य विधानसभेतून निवडून- प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे याच्या कन्या- प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देण्याची मागणीने जोर धरला

सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश होणार या चर्चेने काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह पसरल्याचे दिसून येत आहे. तत्पुर्वी शुक्रवारी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबईतून बोलाविण्याने आल्याचे सांगण्यात आले़ प्रणिती शिंदे या सध्या सोलापुरात आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसभवनात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रम आयोजनाबाबत बैठक झाली. या बैठकीत नगरसेवक चेतन नरोटे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असे वृत्त ‘लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आणले. त्यावर इतर कार्यकर्त्यानी याबाबत आनंद व्यक्त करून सर्वजण मुंबईला जाण्याची तयारी करुया अशी सूचना मांडली.

प्रकाश वाले यांनी आमदार शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मंत्रिमंडळ समावेशाबद्दल सोलापुरात चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे काय ? अशी विचारणा केली. त्यावर आमदार शिंदे यांनी आम्हाला आज मुंबईला बोलावले आहे, थांबा वाट पहा, असा निरोप दिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी आग्रही मागणी शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसministerमंत्रीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार