प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला, सुशीलकुमार शिंदे यांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:51 IST2019-03-25T00:51:32+5:302019-03-25T00:51:54+5:30
पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले.

प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला, सुशीलकुमार शिंदे यांची खरमरीत टीका
सोलापूर : एकजण धर्माच्या नावावर साधुगिरी करतोय, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केली़
पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले़ मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत़ २०१९ची लोकसभा निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशीच आहे़ सध्या मोदी हे हुकूमशाहीप्रमाणे वागत आहेत़ कारण त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्यांना उमेदवारी नाकारली़ त्यांचे खच्चीकरण केले़
मी पवारांना निवडून आणतो - आंबेडकर
वंचित आघाडीच्या धसक्यानेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे़ आमचे अकोल्याचे आणखी ठरलेले नाही़ पवारांनी तेथून लढावे, मी त्यांना निवडून आणतो, असा टोला अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबादमध्ये बोलताना लगावला. सुशीलकुमार शिंदे व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. सुशीलकुमार शिंदे हे नुसतेच बुजगावणे आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.