सांगोला येथे प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:32+5:302021-08-25T04:27:32+5:30

व्यासपीठावर संस्थेचे सचिव म. शं. घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने, पोपट केदार ...

Prabuddhachandra Jhapke felicitated at Sangola | सांगोला येथे प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार

सांगोला येथे प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार

व्यासपीठावर संस्थेचे सचिव म. शं. घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने, पोपट केदार उपस्थित होते.

प्रारंभी संस्था सचिव म. शं. घोंगडे यांनी, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सत्कार केला. मला पुरस्काराच्या रूपाने मिळालेले २१ हजार रुपये व स्वतःकडील ४ हजार असे २५ हजार रुपये चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देत असल्याचे प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रा. माधुरी राजमाने, प्रा. गणेश कांबळे यांच्यासह सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संख्येने उपस्थित होते.

----

फोटो ---

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था सचिव म. शं. घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी सत्कार केला.

Web Title: Prabuddhachandra Jhapke felicitated at Sangola