शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

वीज तारांचा स्पार्क; सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:36 IST

दक्षता म्हणून महावितरणकडून सात गावचा वीजपुरवठा खंडित

ठळक मुद्देउन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हालआग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न

सोलापूर  : महावितरणच्या वीज तारांचा स्पार्क झाल्यामुळे महापालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला मंगळवारी दुपारी एकच्या सुमाराला आग लागली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांनी सायंकाळपर्यंत ४० फेºया करून पाण्याचा मारा केला. तरीही आग आटोक्यात आली नव्हती. कचरा डेपोच्या परिसरातून विजेच्या अतिउच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. दक्षता म्हणून या भागातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे म्हणाले, कचरा डेपोला दुपारी साडेबारा-एकच्या सुमाराला आग लागली. महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारातून स्पार्क होऊन ठिणग्या कचºयावर पडल्या. कचºयाने पेट घेतला. धुराचे लोट आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या. 

या भागातील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात आला. सायंकाळी सहापर्यंत जवळपास ५ गाड्यांद्वारे ४० फेºया करून पाण्याचा फवारा मारण्यात आला, परंतु आग आटोक्यात येत नव्हती. रात्री अंधार आणि धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. वाºयामुळे आग पसरत होती. या धुराचा परिणाम परिसरातील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आग आटोक्यात आली तरी धुराचे लोट कमी व्हायला वेळ लागणार आहे. 

जेसीबीच्या सहायाने या ठिकाणी कचरा बाजूला करुन रस्ता करण्यात आला. त्यातून पाण्याच्या गाड्या नेण्यात आल्या. या आगीची झळ कचरा प्रक्रिया प्रकल्पाला बसण्याची शक्यता असून त्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी रात्री या प्रकल्पाच्या बाजूने आग विझविण्यास सुरुवात केली होती, असे केदार आवटे यांनी सांगितले. 

कचºयांमध्ये मिथेन वायू असतो. या वायूमुळे कचरा आणखी पेट घेतो. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण आग आटोक्यात आणण्यासाठी अनिशामक दलाच्या कर्मचाºयांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. - त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, मनपा. 

या गावांना बसली झळ - कचरा डेपोला आग लागल्यानंतर त्याची झळ विजेच्या तारांना बसू शकते, असा फोन महापालिकेच्या उपायुक्तांनी केला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी तत्काळ या भागातील  हगलूर, उळे, कासेगावसह सात गावचा वीजपुरवठा खंडित केला होता, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले. उन्हाच्या कडाक्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे हाल झाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका