खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:21 PM2019-04-25T15:21:00+5:302019-04-25T15:22:25+5:30

दीड वर्षाची लढाईला मिळाले यश;  राज्यातल्या १५२ डाकसेवकांनाही खात्यात सामावून घेतले

Postmen of Mumbai postal service became canceled by the cancellation of open recruitment rules | खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

खुल्या भरतीतील अटी रद्द करत डाकसेवक बनले मुंबईचे पोस्टमन

Next
ठळक मुद्देखुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : खुल्या भरतीसाठी लावलेल्या नियमाविरोधात दीड वर्षांपासून लढा देऊन ग्रामीण पोस्टमन संघटनेने अटीच रद्द करायला लावल्या़ तसेच मुंबईतल्या रिक्त जागांवर खात्यांतर्गत काम करणाºया ग्रामीण डाकसेवकांना संधी देण्यास भाग पाडले आहे़ मागील महिन्यात पंढरपूर विभागातून दोन तर सोलापूर शहर विभागातील तीन ग्रामीण डाकसेवकांनी मुंबईचे पोस्टमन म्हणून काम करण्याची संधी मिळवली आहे.

काही दिवसांपूर्वी पोस्टामध्ये खुली नोकरभरती सुरू करण्यात आली़ दहावी उत्तीर्ण झालेले खात्यांतर्गत कर्मचारी हे डाकसेवक म्हणून काम करायला लागले़ दहावी इयत्तेवर सेवेत दाखल झालेल्यांना पुढे पोस्टमन म्हणून संधी नव्हती़ मात्र खुल्या भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला वाहन परवाना आणि एमएस-सीआयटीची पात्रता लावून कोणत्याही शहरातील उमेदवाराला चक्क पोस्टमन पदावर संधी दिली.

 दुजाभाव करणारा नियम ग्रामीण डाकसेवकांना भेडसावू लागला़ आॅल इंडिया पोस्टमन एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांच्या नेतृत्वाखाली सेके्रटरी राजेश सागर आणि ग्रामीण डाकसेवक राजकुमार आतकरे यांनी मुंबईचे संचालक व्यवहारे आणि दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला़ ‘खुल्या भरतीत उमेदवारांना लावलेल्या अटी रद्द करा आणि खात्यांतर्गत जुन्या पद्धतीच्या अटी लागू करा’ हा एकच मुद्दा घेऊन पाठपुरावा चालवला़ खुल्या भरतीमुळे खात्यांतर्गत ग्रामीण डाकसेवकांवर अन्याय व्हायचा आणि त्यांना पुढे संधी मिळत नव्हती.

अन् मार्चमधील परीक्षा पुढे ढकलली
- खुल्या भरतीत लावलेल्या नियम-अटी रद्द झाल्या़ तत्पूर्वी मार्चमध्ये पोस्टमनसाठी होणाºया परीक्षार्थींपैकी जे पात्र ठरले होते त्यांना थांबवत ही परीक्षाच पुढे ढकलायला लावली़ आता ही भरती खात्यांतर्गत होणार असल्याचे ग्रामीण डाकसेवक संघटनेकडून सांगितले जाते़ तसेच आता ग्रामीण डाकसेवकही संगणक प्रशिक्षण घेऊन पोस्टमन होऊ शकतात़ 

मुंबईचे पोस्टमन झालेले ग्रामीण डाकसेवक
- पंढरपूर विभाग - पांडुरंग सुरेश काळे (बिटरगाव), संजय देवकुळे (नातेपुते)
सोलापूर विभाग - आरशिया जहागीरदार (सय्यद वरवडे), मुल्ला (होनमुर्गी), रत्नाबाई अचलेरे (शिंगडगाव).

ग्रामीण डाकसेवकावर अन्याय करणारा नियम पोस्टमनसाठी आणला गेला होता़ दहा-दहा वर्षे सेवा करणाºया सेवकाला संधीच नव्हती़. खुल्या भरतीतील अटी रद्द करायला भाग पाडल्याने राज्यभरातील १५२ ग्रामीण डाकसेवक आता मुंबईत पोस्टमन म्हणून दाखल झाले आहेत़ तसेच सोलापूर आणि पंढरपूर विभागातून पाच जणांनाही त्यामध्ये संधी मिळाली आहे़ 
- राजकुमार आतकरे 
सचिव, ग्रामीण डाकसेवक 

Web Title: Postmen of Mumbai postal service became canceled by the cancellation of open recruitment rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.