सोलापुरातील अनधिकृत बांधकामाचे पोस्टर प्रदर्शन; कामगार सेनेचे अनोखे आंदोलन
By Appasaheb.patil | Updated: March 29, 2023 15:30 IST2023-03-29T15:30:17+5:302023-03-29T15:30:37+5:30
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चक्री उपोषण सुरू आहे.

सोलापुरातील अनधिकृत बांधकामाचे पोस्टर प्रदर्शन; कामगार सेनेचे अनोखे आंदोलन
सोलापूर : शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत व बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत मागील १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर आंदोलन करूनही यावर महापालिका अधिकारी कोणताच निर्णय घेत नाहीत. त्यामुळे बुधवारी शहरातील अनधिकृत बांधकामांचे पोस्टर प्रदर्शन करून कामगार सेनेने अनोखे आंदोलन सुरू केले.
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चक्री उपोषण चालू असून त्या संबंधित मनपा आयुक्त व इतर विभागांनी कोणती दखल घेतलेली नाही, याचाच पुढचा भाग म्हणून ज्यांचे अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर बांधकाम आहे त्याच्या भव्य डिजिटल बोर्ड बनवून छायाचित्राचे जिल्हा परिषदेसमोरील गेटसमोर प्रदर्शन करण्यात आले.
शहरातील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार सेनेने दिला आहे. दरम्यान, दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रवी नायक, दाविद जगले, विक्की जंगले, विशाल सोनवणे, आदित्य वाघमारे आदी उपस्थित होते.