शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस कंपन्या पाजतायंत सोलापूरकरांना बोअरिंगचं घाणेरडं पाणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:12 PM

विलास जळकोटकर  सोलापूर : एकीकडे उजनीचे दूषित पाणी.. सोलापूरकरांना विषाणूजन्य आजाराने घातलेला विळखा.. डॉक्टरांकडून शुद्ध पाणी वापराचा सल्ला.. त्यामुळे ...

ठळक मुद्देकोणताही शासकीय परवाना नाही, अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद नाहीप्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी नाही, तरीही रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल विशेष म्हणजे या जारमधील पाणी ‘लोकमत टीम’ने तपासले असता तब्बल ४६८ टीडीएस इतका निघाला

विलास जळकोटकर 

सोलापूर: एकीकडे उजनीचे दूषित पाणी..सोलापूरकरांना विषाणूजन्य आजाराने घातलेला विळखा.. डॉक्टरांकडून शुद्ध पाणी वापराचा सल्ला.. त्यामुळे घाबरुन सोलापूरकरांनी शुध्द पाण्याचे जार घरी मागवण्यास सुरुवात केली. मग काय? या परिस्थितीचा गैरफायदा उचलून बोगस मिनरल वॉटरच्या उद्योगाला उधाणच येणार नाही तर काय? होय.. गेली कित्येक वर्षे सोलापूर शहर आणि परिसरात मिनरल वॉटरच्या नावाखाली विनापरवाना दूषित पाणी पुरवणारी टोळी सक्रिय झाली आहे. 

सोलापूर शहरात ७०० हून अधिक आणि जिल्ह्यात १००० च्यावर मिनरल वॉटर प्लान्ट थाटले आहेत. यातील नोंदणीकृत प्लान्टची संख्या फार कमी आहे. २० लिटर पाण्याच्या जारची किंमत २० ते ३० रुपये आकारली जाते. मात्र यातून मिळणारे पाणी किती शुद्ध आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया, कावीळ अशा साथीच्या रोगांनी थैमान मांडले. उपचारासाठी हॉस्पिटलकडे जाणाºया रुग्णांना डॉक्टरांकडून दूषित पाण्यामुळे असे आजार उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्याच्या भीतीने अनेकांचा ओढा साहजिकच मिनरल वॉटरकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. नेमका याचाच लाभ उठवत अनेकांनी मिनरल वॉटरचे प्लान्ट उभारले. काहींनी नियमानुसार नोंदी करुन व्यवसाय सुरु केलाय, मात्र ही संख्या नगण्य आहे. 

आपल्या पाल्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालकांनी मिनरल वॉटरचे जार मागवले खरे, पण नेमके त्याची शुद्धता किती याची पाहणी करण्याचे कष्ट फारसे कोणी घेत नाही. खरंच या पाण्याचा टीडीएस (टोटल डिझाल्व्ह सॉलीड) पाहिलाय का? तर नाही हेच उत्तर अनेकांशी साधलेल्या संवादावरुन आढळून आलंय. बोअर, विहिरीतील घाणेरडे पाणी उपसायचे अन् थंड करुन हेच मिनरल वॉटर म्हणून विकायचे असा सारा खटाटोप सर्रासपणे सुरु आहे. यामुळे काही अधिकृतपणे नोंदणी करुन झार पुरवणाºया मंडळींची मात्र गोची होतेय. इकडं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जारच्या पाण्याचा वापर करुनही आजार हटण्याचं नाव घेतलं जात नाही, अशावेळी पालक त्रासले आहेत. यामुळे मिनरल वॉटर म्हणून विकल्या जाणाºया झारवर प्रश्न निर्माण झाले आहे. 

मिनरल वॉटरच्या गावोगावी निर्माण झालेल्या या व्यवसायावर कोणाचा तरी अंकुश असायला हवा. दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात काय देशभर दूषित पाण्याची समस्या निर्माण झालीय. अन्न व औषध प्रशासनाकडे फक्त मिनरल वॉटर सील केलेले बॉटल आणि जार यांचीच नोंदणी झाल्याचे दिसते. 

सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असलेले प्लान्ट अन्न व औषध प्रशासनाच्या कक्षेत

टीडीएस ३० ते ९० दरम्यान असावा- उजनी जलाशयातून उपलब्ध होणाºया पाण्याचा टीडीएस १००० ते १२०० पर्यंत आहे. तर अन्य पाण्याचा टीडीएस सरासरी ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक ठरते. वास्तविक पाहता शुद्धीकरण करताना तो ३० ते ९० च्या दरम्यान खाली आणला जातो, तरच ते पाणी पिण्यायोग्य मानले जाते, अशी माहिती या व्यवसायातील सुहास आदमाने यांनी दिली. यावेत म्हणून मंत्रालयापर्यंत मागणी करुनही त्याची पूर्तता होत नसल्याची खंत शासकीय सूत्रांनी दिली.

पाण्याचे नमुने तपासून घेणे बंधनकारक- सरकारी नियमानुसार मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाºया मंडळींनी वेळोवेळी शासनाने प्रमाणित केलेल्या एनएबीएल यांच्याकडूनच पाण्याचे नमुने तपासून घेतले पाहिजेत. त्याशिवाय पाण्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. अनेक मंडळी खासगी लॅबमधून पाण्याची तपासणी करतात. आमच्याकडे जारच्या पाण्याबद्दलचे नमुने तपासणीसाठी येणारे प्रमाण फार कमी असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे प्रभारी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

खुल्या जारमधून पाणी विक्री बेकायदेशीर- शुद्ध आणि थंड पाण्याच्या जारची सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वास्तविक पाहता अशा खुल्या पाणी विक्रीला बंदी आहे. सीलबंद पाणीविक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. त्यासाठी प्रयोगशाळेची सक्ती आहे. जिल्ह्यात असे शुद्ध पाण्याचे ३९  आणि थंड पाण्याचे ४०० प्लान्ट परवानाधारक असल्याची माहिती पुढे आली आहे. खुल्या जारमधून पाणीविक्रीस बंदी असून, ती शहर, जिल्ह्यात खुलेआम सुरु आहे. त्यावर शासनाच्या अन्न भेसळ विभागाचे नियंत्रण नाही. दरम्यान अन्न औषध प्रशासनाने यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले मात्र कार्यवाही झाली नाही.

वर्षाला ४५ लाखांचे नुकसान- वास्तविक सोलापूर जिल्ह्यात १५०० हून अधिक मिनरल वॉटरचे प्लान्ट आहेत. प्रत्येकांना वर्षभरासाठी परवाना मिळवण्यासाठी ३ हजार रुपये मोजावे लागतात. जिल्ह्यातील हे दीड हजार जारधारकांकडून किमान ४५ लाख बुडतात. तरीही पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर शासनही गांभीर्याने घेताना दिसत नाही.

कोणत्या घटकाची होते तपासणी- शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या पाण्याची दोन प्रकारे तपासणी केली जाते. यात रासायनिक, अनुजीव तपासणीसाठी अनुक्रमे ६०० अन् ३०० रुपये अधिकृत फी आकारली जाते. कोलीफाम आणि थर्मोटॉलरन्ट या विषाणूंचे किती प्रमाण आहे यावरुन पाण्याची शुद्धता निश्चित केली जाते. यात शुद्ध पाण्याचे परिणाम ठरवण्यासाठी टीडीएस (एकूण विद्राव्य घटक) किमान ५०० च्या आत असणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सांगोला धाडीनंतर ‘लोकमत’चा शोध- कोणताही शासकीय परवाना नाही, अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद नाही, प्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी नाही, तरीही रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या मिनरल वॉटरच्या माध्यमातून सुरु आहे. ग्रामीण भागदेखील यातून सुटला नाही. सांगोल्यात एका बोगस कंपनीवर धाड पडल्यानंतर ‘बातमी मागची बातमी’ शोधण्यासाठी लोकमत टीम लागली कामाला. विशेष म्हणजे या जारमधील पाणी ‘लोकमत टीम’ने तपासले असता तब्बल ४६८ टीडीएस इतका निघाला.

दूषित पाण्यातील विषाणूजन्य जंतूमुळे उलटी, जुलाब, हेपॅटायटिस ए अर्थात कावीळ, सर्दी, ताप, खोकला, पोटाचे विकार आदी आजार उद्भवतात़ लहान मुले आणि वृद्धांना याची जलदगतीने लागण होते.  - प्रा. डॉ. विठ्ठल धडके, व्ही. एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर

पाण्याच्या गुणवत्तेबद्दल तपासणी अधिकार आमच्याकडे आहेत, मात्र यासाठी मानदे कायद्यानुसार सीलबंद असलेल्या मिनरल वॉटर बाटल्या आणि जारची तपासणी होते. जारद्वारे लूज पाणी विक्री करणारे व्यावसायिक आमच्या कक्षेत येत नाहीत. मुळात सीलबंद शिवाय अन्य पाणी विक्री करता येत नाही.- प्रदीप राऊत, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूक