शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Politics; माढ्यात चंद्रकांतदादा तर सोलापुरात जयसिध्देश्वर महास्वामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:10 IST

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरविण्याबाबत प्रदेश ...

ठळक मुद्दे भाजपा नेत्यांची चाचपणी; प्रशांत परिचारक, शिंदे गटाला सोबत घेण्याचा प्रयत्नभाजपाने चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारीसोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार म्हणून शरद बनसोडे यांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरविण्याबाबत प्रदेश भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. सोलापूर मतदारसंघात विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे नाव आघाडीवर आहे. बनसोडेंना पक्षांतर्गत विरोध झाल्यास गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचे नाव पुढे येईल, असेही रविवारी सांगण्यात आले.

माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपाची कोंडी झाली आहे. पवारांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट नाराज आहे. या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. पवारांविरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिल्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उत्तम जानकर आदी मंडळी सहकार्य करणार नाहीत, असे प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांचे मत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदे आणि परिचारक यांच्या मदतीने जिल्ह्यातील नेत्यांची वेगळी मोट बांधली आहे.

चंद्रकांतदादांना मैदानात उतरविल्यास हे दोन्ही गट सहकार्याची भूमिका  घेतील. या दोन्ही गटांना भविष्यातील आश्वासने देऊन बांधून ठेवायचे. करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे नाराज कार्यकर्ते चंद्रकांतदादांना सहकार्य करतील, असा अंदाजही ज्येष्ठ सदस्यांनी प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांपुढे व्यक्त केला आहे. माढ्याबाबत भाजपा नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. 

महास्वामींना वर्षा बंगल्यावरुन फोन आला अन्...सोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार म्हणून शरद बनसोडे यांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी विरोध केल्यास डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींचे नाव पुढे येऊ शकते. मागील आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त महास्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार होती, मात्र त्यांचे बोलणे झाले नाही. दरम्यान महास्वामी आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर महास्वामी सोलापूरकडे निघाले. सोलापुरात पोहोचल्यानंतर महास्वामींना वर्षा बंगल्यावर येण्याबाबत निरोप आला. महास्वामींना पुन्हा वर्षा बंगल्यावरुन बोलावणं येण्याची शक्यता आहे. 

चंद्रकांतदादांवर सोलापूरची अतिरिक्त जबाबदारीभाजपाने चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली होती. मात्र पवारांचे नाव चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रकांतदादांना सोलापूर जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. त्यांनी अद्याप होकार दर्शविला नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपा