सोलापूरातील पोलीसांच्या पेट्रोलपंपावरील रक्कम लुटणाºया टोळीला अटक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 15:05 IST2018-07-05T14:54:17+5:302018-07-05T15:05:28+5:30

सोलापूरातील पोलीसांच्या पेट्रोलपंपावरील रक्कम लुटणाºया टोळीला अटक !
सोलापूर : मागील काही महिन्यांपुर्वी सोलापूर शहरातील अशोक चौक येथे असलेल्या शहर पोलीसांच्या पेट्रोल पंपावरील रक्कम चोरीला गेली होती़ या चोरीतील आरोपींना पकडण्यात शहर पोलीसांना यश आल्याचे सांगण्यात आले आहे़
कुमार भोसले, कुमार सुरवसे, विठ्ठल भोसले (रा़ तळे हिप्परगा) व अमित जाधव (रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) या चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून सांगण्यात आली़ या प्रकरणातील फिर्यादी मारूती राजमाने यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली आहे़
पेट्रोल पंपावरील रोकड चोरणारी टोळी शहराजवळच असलेल्या हिप्परगा, अकलूज, टेंभुर्णी व शहरातील जोशी गल्लीतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यातील मुख्य आरोपी कोण व कुठले आहेत याबाबत सोलापूर शहर पोलीसांनी सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे़ याच पत्रकार परिषदेत संबंधित आरोपींची नावे समोर येणार असल्याचे सांगण्यात आले़