शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

पोलीसदादा.. आज तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर, मग आम्हीही डबा पुरवू तुमच्यासाठी ड्यूटीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:04 IST

बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम; दररोज दोनवेळचे जेवण; सामाजिक क्षेत्रातील मंडळीही सरसावली

ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र व शासनाने  उपाययोजनांचा भाग म्हणून देशात ‘लॉकडाउन’या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दादा आपल्या घरांची तमा न बाळगता २४ तास बंदोबस्तासाठी तैनातहॉटेल्स बंद असल्याने त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन मातृभूमी प्रतिष्ठान सरसावले

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी:  कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र व शासनाने  उपाययोजनांचा भाग म्हणून देशात ‘लॉकडाउन’ करुन संचारबंदी लागू केली आहे़ या काळात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दादा आपल्या घरांची तमा न बाळगता २४ तास बंदोबस्तासाठी तैनात आहे. यामध्ये अनेक जण बाहेरगावचे आहेत. हॉटेल्स बंद असल्याने त्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन मातृभूमी प्रतिष्ठान सरसावले आहे. शहरातील पस्तीस पोलिसांना दोन वेळचे जेवण जागेवर मोफत स्वरुपात पोहोच केले जात आहे़ याशिवाय दैनंदिन प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेचे ५०० हून अधिक डबे नियमित पुरवले जात आहेत. 

कोरोनामुळे पोलीस तसेच वैद्यकीय यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे़ सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे हॉटेल्स देखील बंद आहेत़ साधा चहा देखील स्त्यावर मिळत नाही़ त्यामुळे अशा ड्यूटी बजावणाºया प्रशासनातील लोकांसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना पुढे येत आहेत़ बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये इतर ठिकाणांहून दंगाकाबू पथकातील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत़ या पोलिसांना जेवणाची अडचण होती़ ती मातृभूमी प्रतिंष्ठानच्या माध्यमातून दूर झाली आहे. 

प्रतिष्ठानच्या पाटील प्लॉट येथील किचनमधून या पोलिसांसाठी सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळचे जेवण प्रतिष्ठानच्या रिक्षामधून पोहोच केले जात आहे़ यामध्ये एका वेळेला तीन चपाती, सुकी भाजी आणि मसाला भात असा जेवणाचा डबा दिला जात आहे़ तसेच गेल्या चार वर्षांपासून समाजातील ज्यांना कोणी नाही, खाण्याचे वांदे आहेत अशा १६५ निराधारांना घरपोच दोन वेळचा डबा दिला जातो. तो देखील या काळातही सुरुच आहे़ शहरातील कॅन्सर हॉस्पिटल, जगदाळे मामा व इतर हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दहा रुपयात दोन चपाती व भाजी असे जेवण दिले जाते ते देखील काम सुरुच आहे.

गरिबांना मिठाई.. पाणी अन् सरबतचे वाटप- प्रतिष्ठानच्या दोन रिक्षा असून त्याद्वारे हे वाटप केले जाते़ याशिवाय शहरातील स्विटमार्ट चालकांनी देखील बंदमुळे दुकानातील माल खराब होण्यापेक्षा तो गोरगरिबांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ तसेच समर्थ वॉटर सप्लायर्सच्या वतीने देखील दुचाकी गाडीवर शहरात फिरुन शुद्ध पाणी पुरवण्याची ड्यूटी बजावत असलेल्या पोलिसांना जागेवर पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात आहे.   - अतुल पांडे मित्रपरिवाराच्या वतीने गेले दोन दिवस दुपारी शहरात फिरुन पोलीस  व आरोग्य कर्मचाºयांना चहा व सरबत दिले जात आहे़ ही सेवा संचारबंदी असेपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सचिन शिंदे यांनी बोलताना सांगितले. 

सामाजिक भान- बार्शीतील उद्योजक दिलीप खटोड परिवाराच्या वतीने पोलिसांना सकाळचा नाष्टा गेल्या चार दिवसांपासून दिला जात आहे तर शुक्रवारपासून लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने सायंकाळचा फलाहार व चहाची सोय केली जाणार आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे क्लबचे सचिव महावीर कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस