पोलिसाला धक्काबुक्की करणार्यास अटक
By Admin | Updated: May 7, 2014 22:32 IST2014-05-07T21:49:38+5:302014-05-07T22:32:30+5:30
सोलापूर : रस्त्यामध्येच मोटरसायकल थांबवून उभारल्याने हटकल्यावर वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी राम किसनसिंग मन्सावाले (वय ४६, रा. ७२३ उत्तर सदर बझार) याला जेलरोड पोलिसांनी अटक केली.

पोलिसाला धक्काबुक्की करणार्यास अटक
सोलापूर : रस्त्यामध्येच मोटरसायकल थांबवून उभारल्याने हटकल्यावर वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी राम किसनसिंग मन्सावाले (वय ४६, रा. ७२३ उत्तर सदर बझार) याला जेलरोड पोलिसांनी अटक केली.
वाहतूक शाखेतील शिपाई ज्ञानेश्वर घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राम मन्सावाले याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक घाडगे व हवालदार धामणसकर हे दोघे ६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता शांती चौकातील जड वाहतूक सुरळीत करीत होते. अशोक चौकाकडून बोरामणी चौकाकडे निघालेला आरोपी राम शांती चौकात मोटरसायकल बंद करून थांबला. त्याला घाडगे यांनी मोटरसायकल बाजूला घे म्हटल्यावर त्याने शिवीगाळ केली. पोलिसांनीच त्याला बाजूला केल्यावर त्याने आकंडतांडव केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर जामीन मिळाला. आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.